एक्स्प्लोर

Team India : टीम इंडियात येणार खतरनाक ट्विस्ट! 3 वर्षांनी मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची कुजबुज, BCCIच्या बैठकीत काय शिजतंय?

India vs Afghanistan Test Match : आयपीएल 2026 संपल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मिशनवर उतरणार असून, पहिलं मोठं आव्हान अफगाणिस्तानचं असणार आहे.

India vs Afghanistan Test Match : आयपीएल 2026 संपल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मिशनवर उतरणार असून, पहिलं मोठं आव्हान अफगाणिस्तानचं असणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 1 कसोटी आणि 3 वनडे सामने खेळवले जाणार आहेत. मात्र या मालिकेआधीच भारतीय कसोटी संघाच्या भवितव्याबाबत बीसीसीआयमध्ये मोठी हालचाल सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्यात बीसीसीआय अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेऊ शकते. या बैठकीत भारतीय कसोटी संघाच्या भविष्यासंदर्भात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. टीम मॅनेजमेंटला आगामी प्रत्येक कसोटी सामन्यात सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन उतरवायची आहे, पण आयपीएल 2026 प्लेऑफमध्ये कोणते संघ पोहोचतात यावरही निवड समितीचे बारकाईने लक्ष असणार आहे.

विशेषतः वेगवान गोलंदाजांच्या निवडीबाबत प्लेऑफनंतरच अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सध्या फक्त जसप्रीत बुमराहबाबत निर्णय निश्चित झाला आहे. मुंबई इंडियन्स आयपीएल 2026 मधून बाहेर पडल्यामुळे बुमराह प्लेऑफ खेळणार नाहीत.

दुसरीकडे, हर्षित राणा आणि आकाश दीप दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर राहिले. तर गुजरात टायटन्स जवळपास प्लेऑफमध्ये पोहोचली असून, त्यांचे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे.

दरम्यान, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली असली तरी 2023 नंतर त्यांनी भारतासाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. रिपोर्टनुसार, निवड समिती आता शमींना पुन्हा संधी देण्याच्या विचारात नसल्याचं समजत आहे. याशिवाय बीसीसीआय काही युवा वेगवान गोलंदाजांवरही लक्ष ठेवून आहे. त्यामध्ये अंशुल कंबोज हे प्रमुख नाव असून, गुरनूर ब्रारलाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा -

Pakistan Test Captain : बांगलादेशकडून लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! मसूदची खुर्ची धोक्यात, बाबर आझम पुन्हा बनणार कर्णधार?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL News : हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
AUS vs BAN 2nd Test : 229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget