Shreyas Iyer Indian Tes Team : बांगलादेशविरुद्ध चेन्नई येथे होणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी श्रेयस अय्यरची टीम इंडियात निवड झाली नाही. आजकाल अय्यर दुलीप ट्रॉफीमध्ये इंडिया डी संघाचे नेतृत्व करत आहेत. ज्यामध्ये अजून तरी अय्यरला बॅटमधून काही विशेष कामगिरी करता आली नाही. दरम्यान, बीसीसीआयचा नवा आदेश समोर आला आहे, ज्यामध्ये अय्यरला सध्या भारतीय कसोटी संघात स्थान नसल्याचे सांगण्यात आले आहे.


श्रेयस अय्यरबद्दल टेलिग्राफशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "सध्या श्रेयसला कसोटी संघात स्थान नाही. तो कोणाची जागा घेणार? याशिवाय दुलीप ट्रॉफीमध्ये त्याच्या शॉटची निवड हा चिंतेचा विषय ठरला आहे. तो सेट झाला होता आणि नंतर अचानक त्याने हा शॉट खेळला. जेव्हा तुम्ही सेट आणि सपाट ट्रॅकवर फलंदाजी करता तेव्हा तुम्हाला त्या संधीचा सर्वोत्तम उपयोग करणे आवश्यक आहे."


टीम इंडियाने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. अय्यर मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत खेळताना दिसला होता. मात्र, दोन्ही सामन्यांमध्ये अय्यरला विशेष काही करता आले नाही. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यापूर्वी टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. अय्यर आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतही खेळताना दिसला होता.


आतापर्यंत श्रेयस अय्यरची कसोटी कारकीर्द


श्रेयस अय्यरने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 24 डावात फलंदाजी करताना त्याने 36.86 च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत. या काळात अय्यरने 1 शतक आणि 5 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने 2021 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण केले.


हे ही वाचा -


India vs China Hockey Champions Trophy Final : टीम इंडियाच आशियाई चॅम्पियन! फायनलमध्ये चीनला चारली धूळ, पाचव्यांदा ट्रॉफी घातली बॅगेत


India vs China Hockey Champions Trophy Final : चेहऱ्यावर मास्क, हातात चीनचा झेंडा; भारताविरुद्ध चीनला पाठिंबा, पाकिस्तानी हॉकी संघाचा फोटो व्हायरल


Rohit Sharma Ind vs Ban : "विचार करण्याची गरज नाही...", कर्णधार रोहितने बांगलादेशविरुद्ध सामन्यापूर्वी भारतीय Playing 11बद्दल केलं मोठं वक्तव्य