BCCI Central Contract : बीसीसीआयनं (BCCI) 1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीसाठी केंद्रीय करार (BCCI Central Contract) जारी केला आहे. बीसीसीआयच्या या करारातून अनेक खेळाडूंना वगळण्यात आलं आहे. स्वतःहून बीसीसीआयची नाराजी ओढावून घेतलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)आणि ईशान किशनचा (Ishan Kishan) पत्ता बीसीसीआयनं कापल्याचं स्पष्ट झालं आहे. ईशान आणि श्रेयस व्यतिरिक्त बीसीसीआयनं इतरही अनेक खेळाडूंना डच्चू दिला आहे. अशातच मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचं काय झालं? बीसीसीआयनं ज्या खेळाडूंसोबत केंद्रीय करार केला आहे, त्या यादीतून अनेक अनुभवी खेळाडूंना वगळलं आहे, या सर्व अनुभवी खेळाडूंमध्ये अनुभवी अजिंक्य रहाणेचंही (Ajinkya Rahane) नाव आहे. 


चेतेश्वर पुजारा, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे या दोन अनुभवी खेळाडूंना या करारातून वगळण्यात आलं आहे. शिखर धवनचाही या करारात समावेश करण्यात आलेला नाही. यानंतर आता त्यांची कारकीर्द ठप्प झाली आहे का? एकेकाळी संघाची धुरा सांभाळणारे टीम इंडियाचे धुरंधर आहे टीम इंडियात खेळताना कधीच दिसणार नाहीत? असा प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचं नाव बीसीसीआयच्या केंद्रीय करारातून वगळण्यात आल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलनंतर पुजाराने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली होती, मात्र आता त्याला संघातून वगळल्यानंतर त्याला बीसीसीआयनं केंद्रीय करारातूनही वगळलं आहे. आता यानंतर त्याची कारकीर्द थांबली का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबरोबरच, टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय विजय मिळवून देणारा माजी उपकर्णधार आणि दमदार फलंदाज अजिंक्य रहाणे देखील या कराराचा भाग नाही. गेल्या वर्षी आयपीएलनंतर रहाणे टीम इंडियात परतला खरा. तो WTC 2023 चा अंतिम सामनाही खेळला आणि त्यानंतर टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला. मात्र त्यानंतर त्याला अचानक संघाबाहेर ठेवण्यात आलं. ते आतापर्यंत त्याला टीम इंडियात कमबॅक करण्यात आलंच नाही. 


अजिंक्य रहाणेचे आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्स 


• 82 कसोट्या, 4931 धावा, 38.52 सरासरी 
• 90 वनडे, 2962 धावा, 35.26 सरासरी 
• 20 टी-20, 375 धावा, 20.83 सरासरी 


अजिंक्य रहाणेचं कमबॅक तसं कठीणच... 


गेल्या अनेक दिवसांपासून अजिंक्य रहाणे आपल्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या रणजी ट्रॉफीतही अजिंक्य फारशी चांगली खेळू करू शकला नसून त्याची बॅट शांतच पाहायला मिळाली. दोन सामन्यांतील तीन डावांत रहाणेनं फक्त 16 धावा काढल्या. त्याला दोन वेळा खातंही उघडता आलं नाही. अशा परिस्थितीमध्ये अजिंक्य राहणेला संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसतेय. अजिंक्य रहाणेनं जुलै 2023 मध्ये त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. तेव्हापासून आजपर्यंत रहाणे आंतरराष्ट्रीय सामन्यांपासून लांबच राहिला. 


चेतेश्वर पुजारा भन्नाट फॉर्मात, पण...


चेतेश्वर पुजारा यांनी अखेरचा कसोटी सामना जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये खेळला होता. त्यानंतर विडिंज दौऱ्यातून त्याचा पत्ता कट झाला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही त्याला वगळण्यात आले.  रणजी चषकामध्ये पुजाराने शानदार कामगिरी केली. त्याने तीन सामन्यातील पाच डावात 444 धावा चोपल्या आहेत. एक द्विशतकही ठोकले आहे. झारखंड सारख्या कमकुवत संघाविरोधात त्याने द्विशतक ठोकलेय. पण दोन सामन्यासाठी पुजाराला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. 


चेतेश्वर पुजारा देशांतर्गत क्रिकेटमध्ये फॉर्मात आहे. पुजारा लयीत दिसतोय, पण बीसीसीआय त्याला इंग्लंडविरोधातील अखेरच्या तीन सामन्याआधी आणखी थोडा वेळ देऊ शकते. म्हणजे पुजाराला आणखी काही रणजी सामन्यात खेळावं लागेल. पुजाराने रणजी सामन्यात आणखी काही चांगल्या खेळी केल्या तर त्याला अखेरच्या तीन सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. विराट कोहलीची रिप्लेसमेंट म्हणून पुजाराला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. जरी संधी मिळाली तर प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे.