MIW vs UPW IPL : महिला आयपीएलमधील सहावा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि युपी वॉरियर्स दरम्यान खेळवण्यात आला. बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात युपी वॉरियर्सने (UP Warriorz) गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने धुव्वा उडवलाय. सोलापूरच्या किरण नवगिरेने (kiran navgire) केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर युपी वॉरियर्सचा या हंगामातील पहिला विजय आहे. तिने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तिने या खेळी दरम्यान चौकार आणि षटकारांच्या मदतीने 10 चेंडूत 48 कुटल्या आहेत. याआधी यूपीला दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. मुंबईविरुद्ध मात्र, युपीने विजयाचे खाते उघडले आहे. 


किरण नवगिरेची जोरदार फटकेबाजी 


युपी वॉरियर्सकडून सोलापूरच्या किरणने जोरदार फटकेबाजी केली. तिने मुंबईच्या गोलंदाजांना धू धू धूतले. शिवाय आयपीएलमध्ये तिने पहिले अर्धशतकही ठोकले. किरण नवगिरेने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. आज तिने 6 चौकार आणि 4 षटकार लगावले. कर्णधार एलिसा हिली हिच्यासोबत तिने पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी रचली. किरणने  57 धावांपैकी 48 धावा या चौकार आणि षटकारांच्या जोरावर केल्या. 


मुंबईचा हंगामातील पहिला पराभव 


मुंबईला या हंगामात पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुंबईने यापूर्वी  दिल्ली आणि गुजरात जायंट्सचा पराभव केला होता. स्पर्धेच्या इतिहासातील यूपी आणि मुंबईमधील हा चौथा सामना होता. दोन्ही संघांनी प्रत्येकी 2 सामने जिंकले आहेत.  गेल्या वर्षीच्या हंगामात मुंबई आणि यूपीने प्रत्येकी एक सामना जिंकला होता. त्यानंतर एलिमिनेटरमध्ये मुंबईने यूपीचा पराभव केला होता. 


यूपीने अवघ्या 16.3 षटकांत लक्ष्य गाठले


यूपीची कर्णधार ॲलिसा हेली हिने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या मुंबईने 20 षटकांत 6 बाद 161 धावा केल्या. यूपी संघाने 16.3 षटकात 163 धावा करत सामना जिंकला. यूपीचा पुढील सामना 1 मार्चला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध असणार आहे. तर मुंबई 2 मार्चला बँगलोरविरुद्ध मैदानात उतरणार आहे. 


किरण आणि हेली यांच्यामध्ये 96 धावांची भागीदारी 


यूपीकडून किरण नवगिरेने धमाकेदार अर्धशतक झळकावले. त्याने 31 चेंडूत 57 धावांची खेळी खेळली. या काळात त्याने सहा चौकार आणि चार षटकार मारले. कर्णधार ॲलिसा हेलीने 29 चेंडूत 33 धावा केल्या. नवगिरे आणि हॅले यांनी पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी करत यूपीच्या विजयाचा पाया रचला. ताहिला मॅकग्रा एक धाव काढून बाद झाली. ग्रेस हॅरिस आणि दीप्ती शर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 65 धावांची भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेले. हॅरिसने 17 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या. दीप्ती शर्माने 20 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 27 धावा केल्या. मुंबईकडून इस्सी वँगने दोन विकेट्स पटकावल्या. 


मॅथ्यूजने हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले


मुंबईकडून हिली मॅथ्यूजने अर्धशतकी खेळी खेळली. तिने  47 चेंडूत 55 धावा केल्या. मॅथ्यूजचे हे हंगामातील पहिले अर्धशतक आहे. यास्तिका भाटियाने 26 आणि अमेलिया केरने 23 धावा केल्या.  कर्णधार ब्रंट 19 धावा करून बाद झाली. पूजा वस्त्राकर 18 धावा करून बाद झाल्या आणि अंजली सरवानी 4 धावा करून बाद झाल्या.


इतर महत्वाच्या बातम्या 


BCCI Central Contract : पहिल्याच कसोटीत इंग्रजांना धडकी भरवणाऱ्या आकाश दीपसह 5 जणांना बीसीसीआयचं 'स्पेशल गिफ्ट'!