South Africa tour of India 2022 : भारतामध्ये सध्या आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलचा 15 वा हंगाम 29 मे रोजी संपणार आहे. त्यानंर दहा दिवसांत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी 20 मालिका रंगणार आहे. ऑस्ट्रेलियात होणारा विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवणून या मालिकेचं आयोजन केले आहे. मात्र, जवळपास दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर भारतीय संघ दहा दिवसांचनंतर लगेच मैदानावर उतरणार आहे. त्यामुळे खेळाडू ताजेतवाणे राहतील का? खेळाडूंना आपली कामगिरी उंचावता येईल का? असे प्रश्न उपस्थित होता. शनिवारी बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील टी 20 मालिकेचं वेळापत्रक जारी केले आहे.
बीसीसीआयने ट्विट करत दक्षिण आफ्रिकेबरोबर मायदेशात होणाऱ्या टी20 मालिकेचं वेळापत्रक जारी केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयी घोडदौड राखण्यासाठी सज्ज आहे. 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान पाच टी 20 सामने होणार आहेत. अखेरचा टी 20 सामना 19 जून रोजी होणार आहे. पाहा संपूर्ण वेळापत्रक
भारत-दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेचं वेळापत्रक |
||||
क्रमांक |
दिवस |
तारीख |
सामना |
ठिकाण |
1 |
गुरुवार |
9 जून |
1st T20I |
दिल्ली |
2 |
रविवार |
12 जून |
2nd T20I |
कटक |
3 |
मंगळवार |
14 जून |
3rd T20I |
वायजाग |
4 |
शुक्रवार |
17 जून |
4th T20I |
राजकोट |
5 |
रविवार |
19 जून |
5th T20I |
बेंगलरु |
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकाविरोधात दोन हात करणार आहे. या मालिकेत भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी कऱणाऱ्या काही युवा आणि अनुभवी खेळाडूंना संघात स्थान मिळू शकते. तसेच हार्दिक पांड्याचं संघात पुनरागन नक्की असल्याचे बोलले जातेय. शिवाय विराट कोहलीला विश्रांती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकाविरोधात मायदेशात खेळल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर इंग्लंडबरोबर होणाऱ्या एका कसोटी सामन्यासाठी नियमीत संघ जाऊ शकतो.