Team India: भारतीय नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं भारतीय क्रिकेट संघाच्या पुढील तीन महिन्यांचं शेड्यूल जारी केलंय. जानेवारी ते मार्चपर्यंत भारतीय संघ मायदेशात श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याशी दोन हात करणार आहे. सुरुवातीला भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तितक्याच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. दरम्यान, चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9-13 फेब्रुवारीदरम्यान खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. 

श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना 03 जानेवारी 2023 मुंबई
दुसरा टी-20 सामना 05 जानेवारी 2023 पुणे
तिसरा टी-20 सामना 07 जानेवारी 2023 राजकोट
पहिला एकदिवसीय सामना  10 जानेवारी 2023 गुवाहाटी
दुसरा एकदिवसीय सामना 12 जानेवारी 2023 कोलकाता
तिसरा एकदिवसीय सामना 15 जानेवारी 2023 तिरुअनंतपुरम

 

न्यूझीलंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)

सामना तारीख ठिकाण
पहिला एकदिवसीय सामना 18 जानेवारी 2023 हैदराबाद
दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारी 2023 रायपूर
तिसरा एकदिवसीय सामना 24 जानेवारी 2023 इंदूर
पहिला टी-20 सामना  27 जानेवारी 2023 रांची
दुसरा टी-20 सामना 29 जानेवारी 2023 लखनौ
तिसरा टी-20 सामना 01 फेब्रुवारी 2023 अहमदाबाद

 

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)

सामना तारीख ठिकाण
पहिला कसोटी सामना 9-13 फेब्रुवारी 2023  नागपूर
दुसरा कसोटी सामना 17-21 फेब्रुवारी 2023 दिल्ली
तिसरा कसोटी सामना 1-5 मार्च 2023  धर्माशाला
चौथा कसोटी सामना 9-13 मार्च 2023  अहमदाबाद
पहिला एकदिवसीय सामना 17 मार्च 2023  मुंबई
दुसरा एकदिवसीय सामना 19 मार्च 2023  विशाखापट्टम
तिसरा एकदिवसीय सामना 22 मार्च 2023  चेन्नई

हे देखील वाचा-