Shoaib Ali Bukhari Harassed : विश्वचषकातील सामन्यादरम्यान भारतीय चाहते वारंवार वादात अडकत असल्याचे दिसत आहेत. अहमदाबादमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याशिवाय एका पोलिस कर्मचाऱ्या एका सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या चाहत्याला पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यापासून रोखल्याचेही समोर आले होते. पीसीबीने याबाबत आयसीसीकडेही तक्रार केली होती. पण आता यामध्ये बांगलादेशच्या चाहत्यासोबत गैरवर्तन झाल्याचेही समोर आले आहे. बांगलादेशच्या चाहत्यासोबत पुण्यात गैरवर्तन झाले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


व्हिडीओ व्हायरल - 


भारत आणि बागंलादेश यांच्यामध्ये पुण्यात सामना झाला होता. विराट कोहलीच्या शतकाच्या बळावर भारताने या सामन्यात बाजी मारली होती. पण या सामन्यादरम्यान बांगलादेशच्या सुपर फॅन्ससोबत गैरवर्तन झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बांगलादेशचा सुपरफॅन शोएब अली बुखारी याच्यासोबत स्टेडिअममध्ये गैरवर्तन करण्यात आले. त्याच्यासोबत असलेला डमी टायगरला घेऊन भारतीय चाहत्यांनी त्याला टार्गेट केले. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 


पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ...






व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय चाहत्यांवर टीका केली जात आहे. काही भारतीय नेटकऱ्यांनाही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 










शोएब अली बुखारी रोहितचा जबरा चाहता 


शोएब अली बुखारी हा रोहित शर्माचा जबरा चाहता आहे. पुण्यातील सामन्यापूर्वी त्याची आणि रोहित शर्माची भेटही झाली. याबाबत बुखारीने सांगितले. तो म्हणाला की, पुणे स्टेडिअमच्या बाहेर मित्रांसोबत उभा होता. त्यावेळी एका निळा गाडीतून रोहित शर्माची एन्ट्री झाली. रोहितला आवाज दिल्यानंतर त्याने बुखारीसोबत चर्चा केली. रोहित खूप चांगला व्यक्ती असल्याचेही बुखारी याने सांगितले. 


आणखी वाचा :


वर्ल्ड कप दरम्यान नवा वाद? 'पाकिस्तान जिंदाबाद म्हणू नका!', चाहत्यांना पोलिसांनी रोखलं, व्हायरल व्हिडीओनं लक्ष वेधलं