Pakistan Zindabad Controversy: वर्ल्ड कप 2023 ( World Cup 2023) च्या सामन्यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता वर्ल्ड कप 2023 च्या दरम्यान एक नवा वाद निर्माण झाला आहे. बेंगळुरू (Bengaluru) येथे झालेल्या पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australian) या सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहत्यांना "पाकिस्तान जिंदाबाद" अशा घोषणा देण्यापासून रोखलं गेलं.
सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पोलीस अधिकारी हे पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना "पाकिस्तान जिंदाबाद" या घोषणा देण्यापासून रोखत आहेत. त्यामुळे सामना बघायला आलेले पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी संतापले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी पोलीस अधिकाऱ्यांना म्हणत आहे की, "मी पाकिस्तानी आहे, मग पाकिस्तान जिंदाबाद नाही म्हणणार तर काय म्हणणार?”
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. स्टेडियममध्ये मॅच बघायला आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या संघाचे मनोबल वाढवण्याचा अधिकार आहे, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे आता वर्ल्ड कप 2023 च्या दरम्यान नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
"लोकांना गेममध्ये "पाकिस्तान झिंदाबाद" च्या घोषणा देण्यापासून रोखले जात आहे ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे .हे पूर्णपणे खेळाच्या विरुद्ध आहे!", असं ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं आहे.
पाकिस्तान संघाचे संचालक मिकी आर्थर (Mickey Arthur) यांनीही भारतात होणारा विश्वचषक हा आयसीसीचा कार्यक्रम नसून बीसीसीआयचा कार्यक्रम बनल्याचा आरोप केला होता. स्टेडियममध्ये पाकिस्तानी संगीत वाजवले जात नाही किंवा अनेक पाकिस्तानी चाहत्यांना भारतात येण्यासाठी व्हिसा मिळत नाही, असंही त्यांचे मत होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Points Table : पाकिस्तान टॉप 4 मधून बाहेर, ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर गुणतालिकेत उटलफेर