India vs New Zealand : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) चा मध्ये आजच्या सामन्यात टीम इंडिया (Team India) आणि न्यूझीलंड (New Zealand) विजयी वाटचाल कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. दोन्ही संघानी सलग चार विजय मिळवल्यानंतर आता यजमान भारत आणि गतविजेता न्यूझीलंड यांच्या नजरा विजयाच्या पाचव्यासह उपांत्य फेरीतील स्थान मजबूत करण्याकडे असतील. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या आणि शार्दूल ठाकूरच्या जागी मोहम्मद शामी (Mohamamed Shami) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आतापर्यंतचे चारही सामने जिंकले असून दोन्ही संघांकडे समान आठ गुण आहेत. आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) संघामध्ये लढत आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. 


पंड्या आणि शार्दूलच्या जागी 'या' खेळाडूंना संधी


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याला दुखापत झाली, त्यामुळे तो आजच्या सामन्यातून बाहेर गेला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पंड्याच्या जागी सूर्यकुमार यादव मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे शार्दूल ठाकूरच्या जागी मोहम्मद शामीला संधी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.






सरावादरम्यान सूर्याला दुखापत


दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे सर्व खेळाडू सरावासाठी धर्मशाला मैदानावर पोहोचले होते. यावेळी, सूर्यकुमार यादव नेटमध्ये थ्रो-डाऊनद्वारे फलंदाजीचा सराव करत असताना त्याला दुखापत झाली होती. सरावादरम्यान, चेंडू त्याच्या उजव्या हाताला लागला, त्यानंतर सूर्यकुमार यादवला खूप वेदना होत होत्या आणि तो लगेच नेटमधून बाहेर आला आणि डॉक्टरकडे गेला. फिजिओकडून उपचार घेतल्यानंतर सूर्यकुमारला बरं वाटलं, त्याची दुखापत किरकोळ होती, अशी माहिती समोर आली.


भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट


क्रिकेट चाहत्यांसाठी एक चिंतेची बाब म्हणजे आजच्या सामन्यावर पावसाचं सावट (Rain Prediction) आहे. अ‍ॅक्यू वेचर (Accuweather) च्या रिपोर्टनुसार, पावसामुळे आज भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचं सावट आहे. आजच्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. अ‍ॅक्यू वेचरच्या रिपोर्टनुसार, धर्मशालेत पाऊस पडण्याची (Dharamshala Weather Update) शक्यता 40 टक्के आहे. दुपारच्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहू शकते.


दोन्ही संघांची प्लेईंग 11


भारत  : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.