The Ashes 2021 : अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) इंग्लंडवर (England) 9 विकेट्सनी उत्कृष्ट विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार पॅटने अप्रतिम कामगिरी केली असून दुसऱ्या सामन्यात मात्र पॅट खेळत नाहीये. सामन्याआधी एका हॉटेलमध्ये जेवनासाठी गेलेला पॅट कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे एडिलेडमध्ये सुरु दुसऱ्या सामन्यात पॅट नसल्याने तो निराश असल्य़ाचं त्याने ट्वीट करत सांगतिलं आहे. पण याचवेळी त्याने नवख्या मायकेल नेसेरला डेब्यू करण्याची संधी मिळाल्याने त्याच्यासाठी कमिन्स आनंदी असल्याचंही त्याने म्हटलं आहे.


पॅटने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की,”मी टेस्ट खेळच नसल्याने खूप निराश आहे. पण नेसेरसाठी मी उत्साही असून त्याला अखेर डेब्यू करण्याची संधी मिळाली आहे. त्याने यासाठी खूप मेहनत घेतली असून त्याच्यामध्ये योग्यताही आहे. तसंच कोविडच्या संकटाने मागील काही काळात खूप संकटं आली आहेत.”



17 सामन्यानंतर नेसेरला संधी


मायकेल नेसेर याला बऱ्याच काळानंतरऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात स्थान मिळालं आहे. तो 17 सामन्यात संघासोबत होता पण अखेर आता जाऊन त्याला डेब्यू करण्याची संधी मिळाली आहे. पण याआधीही खूप संकटं आली होती. कारण ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवुड दुखापतग्रस्त झाल्यावर नेसेर आणि झाए रिचर्डसन यांच्यातील एकाला संधी मिळणार होती. पण त्यावेळी रिचर्डसनला संधी मिळाली. पण आता कमिन्स संघाबाहेर झाल्यानंतर मात्र नेसेरचे तारे फिरले आणि त्याला संधी मिळाली असून ग्लेन मॅक्ग्राने त्याला कॅप दिली.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha