Virat Kohli Vs BCCI Controversy: क्रिकेट हा अनेकांच्या आवडीचा खेळ. भारतीयही आपल्या लाडक्या खेळाडूंवर आणि संघावर प्रेमाचा वर्षाव करत असतात. पण याच भारतीय संघात मागील काही महिन्यांपासून वेगवेगळे वाद असल्याचं समोर येत आहे. विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट विरुद्ध बीसीसीआय (BCCI), सौरव गांगुली (Sourav Ganguly) विरुद्ध विराट अशा अनेक वादांबाबत चर्चा सुरू आहे. विराटने पत्रकार परिषद घेतल्यानंतर केलेल्या विविध खुलाशांमुळे तर नक्कीच काहीतरी मोठा वाद सुरु आहे. हे जवळपास निश्चित झालं होतं. याबाबत नुकताच माजी भारतीय क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी एबीपी न्यूजसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विराट कोहली आणि सौरभ गांगुली यांना सल्ला दिला आहे.
एबीपी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये कपिल देव यांनी सांगितले, 'मीडियासमोर बोलताना एकमेकांबद्दल असे बोलणे ठिक नाही. काही दिवसांनंतर टीमला दौऱ्यासाठी जायचे आहे. त्या दौऱ्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. टीम इंडियाचे कर्णधार पद ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पण लोकांपुढे येऊन एकमेकांना नावं ठेवण ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. सौरभ असो वा विराट खेळाडूला परिस्थिती योग्यपणे हाताळता आले पाहिजे. तसेच त्यांनी आपल्या देशाचा विचार करावा '
पुढे कपिल देव यांनी सांगितले की, जे चुकीचे आहे ते नंतर लक्षात येईल पण मीडियासमोर आल्यानंतर अशा प्रकारे बोलणे चुकीचे आहे, दौऱ्याच्या आधी कोणती कोंट्रव्हर्सी होणे अत्यंत चूकिचं आहे.
काय आहे वाद?
टी20 विश्वचषक होण्यापूर्वीच कर्णधार विराट कोहलीने विश्वचषकानंतर टी20 संघाचं कर्णधारपद सोडणार असल्याचं घोषित केलं. पण एकदिवसीय संघ आणि कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाबाबत त्याने काहीच सांगितलं नव्हतं. पण नुकतंच आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला, यावेळी एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून विराटच्या जागी रोहितचं नाव घोषित करण्यात आलं आणि पाहता पाहता भारतीय क्रिकेट संघात काही तरी वाद आहे, अशी चर्चा सुरू झाली.
संबधित बातम्या
Virat Kohli Vs BCCI : कोहली, गांगुली की आणखी कोण, भारतीय क्रिकेट संघात वादाची वात कोणी पेटवली?