IND vs AUS, 4th Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 साठी, भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात मागील एक महिन्यापासून 4-कसोटी सामन्यांचं युद्ध सुरू आहे. या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 9 मार्च, गुरुवारपासून अहमदाबादमध्ये सुरू होत आहे. या संपूर्ण मालिकेत फलंदाजांना धावा करणं खूप कठीण झालं आहे. दरम्यान, चौथ्या कसोटी सामन्यात उस्मान ख्वाजाने (usman khawaja) भारताविरुद्ध पहिलं शतक झळकावून नवा विक्रम केला आहे.


भारत विरुद्ध अहमदाबाद कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजाने 422 चेंडूत 180 धावांची खेळी केली.भारताविरुद्ध उस्मानचं हे पहिलं शतक आहे. गेल्या काही काळापासून तो चांगलाच फॉर्ममध्ये असला तरी भारताविरुद्धच्या शेवटच्या 3 कसोटी सामन्यांमध्ये त्याला शतक झळकावता आलं नाही. अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर त्याने गेल्या 30 डावांमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांची बरोबरी केली आहे.


उस्माननं शतक झळकावून केला विक्रम 


उस्मान ख्वाजाने आतापर्यंत गेल्या 30 डावांमध्ये एकूण 6 शतके झळकावली आहेत. त्यांच्याशिवाय इंग्लंडचा जो रूट, जॉनी बेअरस्टो आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांनीही गेल्या 30 डावांत 6 शतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या या सलामीवीर फलंदाजाने आता या बाबतीत या दिग्गज खेळाडूंची बरोबरी केली आहे. अहमदाबाद कसोटी सामन्यात उस्मानने आपल्या शतकी खेळीमुळे टीम ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत आणले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या अहमदाबाद कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांनी 4 गडी गमावून 255 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशीही ऑस्ट्रेलिया 400 पार गेली आहे.


भारतीयांचेही खास रेकॉर्ड


विराट कोहलीने (Virat KohlI) नॅथन लियॉनचा झेल घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 300 झेल पूर्ण केले आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीतील एकदिवसीय-कसोटी आणि टी-20 सह 494 वा सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याने आतापर्यंत 299 झेल घेतले होते. पण आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 झेल पूर्ण झाले आहेत. तसंच अश्विननं एका डावात 6 विकेट्स घेत आणखी एक 5 Wickets Haul हाऊल अर्थात एका डावात पाच विकेट घेण्याचा खास रेकॉर्ड केला आहे. अश्विननं 26 व्या वेळेस घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात एका डावात 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला. त्याने अनिल कुंबळेचा घरच्या मैदानावर सर्वाधिक वेळा 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मोडला. कुंबळेनं ही कामगिरी 25 वेळा केली होती. विशेष म्हणजे अश्विननं 55 वा कसोटी सामना घरच्या मैदानावर खेळताना ही कामगिरी केली असून कुंबळेने ही कामगिरी 63 सामन्यात केली होती.


हे देखील वाचा-