WPL 2023 Points Table : महिला आयपीएल स्पर्धेत आरसीबीला सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. युपी वॉरियर्स संघाने आरसीबीचा दहा विकेट्सने दारुण पराभव केला. या पराभवामुळे गुणतालिकेत आरसीबीचा संघ तळाशी पोहचला आहे. चार सामन्यात चार पराभव स्विकारल्यामुळे आरसीबीच्या गुणांची पाटी कोरीच आहे. तर मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईने तीन सामन्यात तीन विजय मिळवत पहिल्या क्रमांकावर कब्जा केला आहे.
गुणतालिकेतील स्थिती -
मुंबई इंडियन्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबईने तीन सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स तीन सामन्यात दोन विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. युपीच्या संघाचेही चार गुण आहेत. पण त्यांचा नेट रनरेट कमी असल्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गुजरातच्या संघाला तीन सामन्यात फक्त एक विजय मिळवता आला आहे. दोन गुणांसह गुजरातचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. आरसीबीची गुणाची पाटी मात्र कोरीच आहे. आरसीबीचा संघ तळाशी आहे.
आरसीबीची कामगीरी RCB in WPL 2023 -
आरसीबीला चारही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात दिल्लीने 60 धावांनी हरवले तर दुसऱ्या सामन्यात मुंबईने 9 विकेट्सने मात दिली. गुजरातविरोधात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात 11 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तर आज झालेल्या युपी वॉरियर्सने दहा विकेट्सने पराभव केला.
स्मृतीचा फ्लॉप शो, आरसीबीची डोकेदुखी
कर्णधार स्मृती मंधानाचा खराब फॉर्म आरसीबीची डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. स्मृतीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत स्मृतीला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. आरसीबीने स्मृतीला तीन कोटी 40 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात घेतलं. पण स्मृतीला अद्याप फलंदाजी अथवा नेतृत्वात चमक दाखवता आलेली नाही. याचा फटका आरसीबीला बसत आहे.
स्मृती मंधानाला चार सामन्यात अद्याप 100 धावाही करता आलेल्या नाहीत. आतापर्यंत स्मृतीने 35 धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. स्मृतीच्या खराब कामगिरीचा फटका आरसीबीला बसत असल्याची टीका होत आहे.
आणखी वाचा ;
आरसीबीचा पराभवाचा चौकार! आता युपीने 10 विकेट्सनं नमवलं, अॅलिसा हेलीनं 96 धावा चोपल्या