IND vs AUS 4th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील अहमदाबाद कसोटी सामन्याचा पहिला दिवस अनेक अर्थाने खास होता. दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी सामन्याला हजेरी लावली असून विशेष म्हणजे पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान सुमारे 1 लाख प्रेक्षकांनी सामन्याचा आनंद घेण्यासाठी स्टेडियमवर हजेरी लावली. त्यामुळे आता या स्टेडियमच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील एक नवा विक्रम जमा झाला आहे. याआधी एका दिवसात सर्वाधिक प्रेक्षक पोहोचण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या नावावर होता.


2012 बॉक्सिंग-डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, 91,092 प्रेक्षक स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद घेण्यासाठी MCG येथे आले होते. दरम्यान अहमदाबाद कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हेही स्टेडियमवर पोहोचले आणि दोन्ही पंतप्रधानांनी संपूर्ण स्टेडियमचा फेरफटका मारून उपस्थित प्रेक्षकांचं स्वागत केलं. प्रेक्षकांनी देखील खास दाद दिली. दरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यादरम्यान 1 लाखाहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये पोहोचण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2022 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) सीझनच्या अंतिम सामन्यादरम्यान 1 लाखाहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये पोहोचले होते, जो कोणत्याही T20 सामन्यातील प्रेक्षकांच्या दृष्टीने एक विक्रम होता. पण आता कसोटी सामन्यातही हा खास रेकॉर्ड झाला आहे.


ख्वाजा, ग्रीनचं शतक तर अश्विननं घेतल्या 6 विकेट्स


उस्मान ख्वाजा आणि कॅमरुन ग्रीन यांच्या अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभारला. भारताकडून आर अश्विन याने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाने बिनबाद 36 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 16 तर शुभमन गिल 17 धावांवर खेळत आहेत. भारत अद्याप 444 धावांनी पिछाडीवर आहे. 


कोहलीसह अश्विनताही खास रेकॉर्ड


विराट कोहलीने (Virat KohlI) नॅथन लियॉनचा झेल घेताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 300 झेल पूर्ण केले आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीतील एकदिवसीय-कसोटी आणि टी-20 सह 494 वा सामना खेळला आहे. ज्यामध्ये त्याने आतापर्यंत 299 झेल घेतले होते. पण आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 झेल पूर्ण झाले आहेत. तसंच अश्विननं एका डावात 6 विकेट्स घेत आणखी एक 5 Wickets Haul हाऊल अर्थात एका डावात पाच विकेट घेण्याचा खास रेकॉर्ड केला आहे. अश्विननं 26 व्या वेळेस घरच्या मैदानावर कसोटी सामन्यात एका डावात 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला. त्याने अनिल कुंबळेचा घरच्या मैदानावर सर्वाधिक वेळा 5 हून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड मोडला. कुंबळेनं ही कामगिरी 25 वेळा केली होती. विशेष म्हणजे अश्विननं 55 वा कसोटी सामना घरच्या मैदानावर खेळताना ही कामगिरी केली असून कुंबळेने ही कामगिरी 63 सामन्यात केली होती. 


हे देखील वाचा-