Valentines Day : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी स्टीव स्मिथकडून झाली मोठी चुक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Steve Smith, Valentines Day : ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर स्टीव स्मिथ याने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एक खास सोशल मीडिया पोस्ट केली पण चूकून त्याने पत्नीच्या जागी दुसऱ्याच महिलेला टॅग केलं.
![Valentines Day : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी स्टीव स्मिथकडून झाली मोठी चुक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल Australian cricketer Steve Smith tags wrongly Dani Willis while wishing wife on Valentines Day get trolled on Social Media Valentines Day : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी स्टीव स्मिथकडून झाली मोठी चुक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/14/50b0918145d728ff6b11020b60d28a3c1676376503999323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Steve Smith Valentines Day Post : सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ (Team Australia) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy) भारत दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियन संघाने नागपुरातील पहिला कसोटी सामना गमावला आहे. आता संघ आपला दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी आज म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी सर्व क्रिकेटर व्हॅलेंटाईन डे साजरा करत आहेत. पण ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव स्मिथनं (Steve Smith) व्हॅलेंटाईन डे निमित्त पत्नीसाठी खास पोस्ट करताना एक चूक केली. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करताना पत्नीऐवजी दुसऱ्याच महिलेला टॅग केलं, त्याच्या या चुकीमुळे तो ट्रोल झाला आहे.
या चुकीमुळे स्मिथ चर्चेचा विषय ठरला. आपल्या पत्नी डॅनी विलिसला व्हॅलेंटाईनच्या शुभेच्छा देताना त्याने लिहिले, “माझी सुंदर पत्नी @dani_willis ला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा. काही दिवसही तुला भेटण्याची प्रतिक्षा मी करू शकत नाही." पण या पोस्टमध्ये त्याने पत्नीऐवजी तशाच नावाचं अकाऊंच असलेल्या दुसऱ्याच महिलेला टॅग केलं. दरम्यान, स्मिथसाठी एक चांगली गोष्ट म्हणजे त्याची पत्नी डॅनी विलिस ट्विटरवर फारशी सक्रिय नाही. डॅनी विलिसने तिचे शेवटचे रिट्विट सुमारे पाच वर्षांपूर्वी म्हणजे जानेवारी 2018 मध्ये केले होते आणि जानेवारी 2017 मध्ये ट्विट केलं होतं. दरम्यान स्मिथनं हे ट्वीट काही वेळातच डिलीट केलं असून इन्स्टाग्रामवर त्याने योग्य अकाऊंट टॅग करत पोस्ट केली आहे,
View this post on Instagram
नागपूर कसोटीत स्मिथ नापास
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना नागपुरात झाला. या सामन्यात स्मिथ पूर्णपणे फ्लॉप दिसला. त्याने पहिल्या डावात 37 आणि दुसऱ्या डावात नाबाद 25 धावा केल्या. यानंतरही तो दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. पाहुण्या संघ दुसऱ्या डावात अवघ्या 91 धावांत सर्वबाद झाला.
आतापर्यंत चमकदार आहे स्मिथची कसोटी कारकीर्द
जुलै 2010 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत एकूण 93 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 164 डावांमध्ये त्याने 60.90 च्या प्रभावी सरासरीने 8709 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 30 शतकं आणि 37 अर्धशतकं केली आहेत. त्याचवेळी त्याची सर्वोच्च धावसंख्या 239 धावांची आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)