New Zealand Women Vs Australia Women : रविवारचा दिवस ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघासाठी ऐतिहासिक असाच आहे. आज ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड महिला क्रिकेट संघादरम्यान झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझिलंडवर सहा विकेट राखून विजय मिळवला आणि सलग 22 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम नावावर केला. याचसोबत, तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. 


 






ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने केलेला हा विश्वविक्रम पुरुषांच्या संघालाही आतापर्यंत जमला नाही. या आधी सलग 21 एकदिवसीय सामने जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या नावावर होता, तो आता ऑस्ट्रेलियाच्याच महिला क्रिकेट संघाने मोडला आहे. 


ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची ही विजयाची मालिका 12 मार्च 2018 ला सुरू झाली होती. त्यावेळी भारत आणि पाकिस्तानविरोधात ऑस्ट्रेलियाच्या संघाने 3-0 अशा दोन मालिका जिंकून या विश्वविक्रमाकडे वाटचाल केली होती. आजच्या सामन्यातील त्यांचा हा 22 वा विजय आहे.


 






या सामन्यात न्यूझिलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 48.5 षटकात 212 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरुवात काहीशी खराब झाली. पण एलिसा हिली, एलिस पॅरी आणि अॅशलेग गार्डनरच्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने हे लक्ष केवळ 39 व्या षटकातच साध्य केलं आणि न्यूझिलंडवर सहा गडी राखून विजय मिळवला. 


महत्वाच्या बातम्या :