IPL 2021, RCB Team: इंडियन प्रीमियर लीगचं 14 वं पर्व 9 एप्रिलपासून सुरु होणार आहे. आयपीएलमधील पहिला सामना विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्समध्ये होणार आहे. या सामन्याआधी आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. कारण आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिकलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काल दिल्लीला स्टार ऑलराउंडर अक्षर पटेल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळं धक्का बसला होता. हे दोन्ही खेळाडू सध्या आयसोलेशनमध्ये आहेत.
मागील सीझनमध्ये देवदत्तची कामगिरी शानदार
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळणाऱ्या 20 वर्षीय डावखुरा फलंदाज देवदत्त पडिकलनं मागील पर्वातच आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएल 2020 त्याच्यासाठी जोरदार राहिलं. त्यानं या पर्वात विराट कोहलीपेक्षाही अधिक धावा केल्या होत्या. 15 सामन्यात त्यानं 473 धावा केल्या होत्या ज्यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश होता.
IPL 2021 | दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, ऑलराऊंडर अक्षर पटेल कोरोना पॉझिटीव्ह
आयपीएल 2021 वर कोरोनाचं दुष्टचक्र
आयपीएल 2021 सुरु होण्यासाठी केवळ पाच दिवस बाकी आहेत. अशात आरसीबीचा देवदत्त पडिकल आणि दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल यांना कोरोनोची लागण झालीय. तर चेन्नई सुपर किंग्सचा एक सदस्य देखील कोरोनाबाधित झाला आहे. तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचे एकूण 10 कर्मचारी आतापर्यंत कोरोनाबाधित झाल्याची माहिती आहे.
IPL 2021 Viral Video | राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडू रुमचा कॅमेरा बंद करायला विसरला अन्...
यंदाच्या हंगामात दोन संघांचे कर्णधार बदलले
दरम्यान, आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दोन संघांचे कर्णधार बदलण्यात आले आहेत. तर सहा संघांच्या कर्णधारांनी मागील हंगामातही संघाचं नेतृत्व केलं होतं. राजस्थान रॉयल्सने यावेळी संजू सॅमसनला संघाचा कर्णधार म्हणून नेमले आहे. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाचा अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथने संघांचं नेतृत्व केलं होतं. मात्र यावर्षी त्याला संघाने रिलीज केलं आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.