AUS Vs SA 3rd ODI : संपूर्ण जगासमोर साऊथ आफ्रिकेची नाचक्की; ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे इतिहासातील सर्वात लाजिरवाणा पराभव!
Australia Vs South Africa 3rd Odi Match 2025 Highlights : साऊथ आफ्रिकेला त्याच्या वनडे इतिहासातील सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला.

Australia vs South Africa, 3rd ODI : साऊथ आफ्रिकेला त्याच्या वनडे इतिहासातील सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका गमावल्यानंतर शेवटचा सामना तब्बल 276 धावांनी जिंकला. हा विजय ऑस्ट्रेलियाचा वनडे क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय ठरला.
Australia secure a massive win with their all-round brilliance in Mackay 🎉#AUSvSA pic.twitter.com/ZYYY92sHIs
— ICC (@ICC) August 24, 2025
मॅकेच्या ग्रेट बॅरिअर रीफ एरिनावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत केवळ 2 गडी गमावून 431 धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात साऊथ आफ्रिकेची टीम एवढ्या प्रचंड धावसंख्येचं दडपण सहन करू शकली नाही आणि अवघ्या 25 व्या षटकात 155 धावांवर गारद झाली. जरी हा सामना ऑस्ट्रेलियाने मोठ्या फरकाने जिंकला असला तरी तीन सामन्यांची मालिका साऊथ आफ्रिकेने 2-1 ने आपल्या नावावर केली.
Cooper Connolly has his first 5fa in professional cricket! It's the first time he has taken more than three wickets in a game. #AUSvSA pic.twitter.com/MeRNU2Lq7L
— cricket.com.au (@cricketcomau) August 24, 2025
साऊथ आफ्रिकेचा वनडे इतिहासातील सर्वात मोठा पराभव (धावांनी)
- 276 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मॅके (2025)
- 243 धावा विरुद्ध भारत, ईडन गार्डन्स (2023)
- 182 धावा विरुद्ध पाकिस्तान, ग्वाटेमाला (2002)
- 180 धावा विरुद्ध श्रीलंका, कोलंबो (2013)
ऑस्ट्रेलिया संघाचे सर्वात मोठे विजय (वनडे)
- 309 धावा विरुद्ध नेदरलँड्स, दिल्ली (2023)
- 276 धावा विरुद्ध साऊथ आफ्रिका, मॅके (2025)
- 275 धावा विरुद्ध अफगाणिस्तान, वाका (2015)
- 256 धावा विरुद्ध नामिबिया, पोटचेफस्ट्रूम (2003)
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा जलवा
ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर जोडीनं दमदार सुरुवात केली. ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 250 धावांची भक्कम भागीदारी रचली. या दोघांनीही शतक झळकावलं. मिचेल मार्शने 106 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 100 धावा केल्या. तर ट्रॅव्हिस हेडनं फक्त 103 चेंडूत 142 धावांची आक्रमक खेळी केली. त्यात 17 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.
For just the second time in ODI history, the top three all scored centuries! Alex Carey also made 50* coming in at four, as Australia posted a massive 2-431!#AUSvSA live blog: https://t.co/E8dkFmvx1s pic.twitter.com/ObInu7g5br
— cricket.com.au (@cricketcomau) August 24, 2025
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कॅमेरून ग्रीननं केवळ 47 चेंडूत शतक ठोकत इतिहास रचला. वनडेमधील ऑस्ट्रेलियाचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जलद शतक ठरलं. ग्रीननं 55 चेंडूत 8 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीनं 118 धावा फटकावल्या. शेवटी अॅलेक्स कॅरीनं नाबाद 50 धावांचं योगदान देत डावाला ठोस शेवट दिला.
कूपर कॉनोलीचा विकेट्सचा पंजा
427 धावांचा पाठलाग करताना साउथ आफ्रिकेची टीम फक्त 155 धावांवर ऑल आऊट झाली, संघाची सुरुवात निराशाजनक झाली. एडेन मार्करम फक्त 2 धावा करून सीन ॲबॉटच्या गोलंदाजीवर माघारी परतला. दुसरा सलामीवीर रेयान रिकेल्टनही 11 धावांवर बाद झाला. कर्णधार टेम्बा बावुमा फक्त 19 धावा करू शकला. संघासाठी सर्वात मोठी खेळी डेवाल्ड ब्रेविसने केली. त्याने 28 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 49 धावा ठोकल्या. अखेरीस 24.5 षटकांत संपूर्ण संघ गडगडला. ऑस्ट्रेलियाकडून डावखुरा फिरकी गोलंदाज कूपर कोनोलीने अवघ्या 22 धावांत 5 बळी टिपले. जेवियर बार्टलेट आणि सीन ॲबॉट यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.




















