एक्स्प्लोर

Phillip Hughes: आजच्याच दिवशी बाउंसरने झाला होता फिलिप ह्यूजचा मृत्यू, #63notout ट्रेंड!

ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक क्रिकेट सामन्यात 63 धावांवर खेळत असताना सीन एबॉटच्या एका बाउंसरमुळे फिलिप ह्यूजचा (Phillip Hughes) दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज सहा वर्षानंतरही या दुर्दैवी घटनेचे स्मरण लाखो क्रिकेटप्रेमी करतात.

नवी दिल्ली: क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या विक्रमांची चर्चा मोठ्या प्रमाणात केली जाते. पण काही वेळा मैदानावर असं काही घडतं की ती दुर्दैवी घटना म्हणून कायम स्मरणात राहते. क्रिकेटच्या इतिहासात अशीच एक दुर्दैवी घटना 27 नोव्हेंबर 2014 साली घडली होती. आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक क्रिकेट सामन्यात एका बाउंसरवर जखमी झाल्याने 25 वर्षीय युवा फलंदाज फिलिप ह्यूजचा मृत्यू झाला होता.

जन्मदिवसाच्या तीन दिवस आधी मृत्यूचा घाला गोलंदाज सीन एबॉटच्या एक बाउंसरने 24 नोव्हेंबर 2014 रोजी फिलिप ह्यूज वेध घेतला. त्यावेळी फिलिप ह्यूजने हेल्मेट घातले असले तरी तो बाउंसर त्याच्या मानेच्या भागावर आदळला आणि तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याला मैदानावरुन स्ट्रेचरच्या माध्यमातून बाहेर नेण्यात आले. त्यानंतर सिडनीच्या एका हॉस्पिटलमध्ये फिलिप ह्यूज तीन दिवस मृत्यूशी झुंज देत होता. अखेर 27 नोव्हेंबर रोजी झुंज अपयशी ठरली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे तीनच दिवसानंतर, म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी त्याचा जन्मदिवस होता. त्या आधीच फिलिप ह्यूजने जगाचा निरोप घेतला.

ऑस्ट्रेलियामध्ये 30 नोव्हेंबर 1988 रोजी जन्मलेल्या फिलिपने त्याच्या क्रिकेट करियरमध्ये 26 कसोटी, 25 वनडे इंटरनॅशनल आणि एक टी-20 इंटरनॅशनल सामने खेळले होते. त्याने 9 जानेवरी 2006 साली न्यू साउथ वेल्स संघाच्या माध्यमातून अंडर-17 क्रिकेट सामने खेळायला सुरु केले होते. त्याचा अखेरचा सामना तो खेळत असताना त्याने 63 धावा केल्या होत्या.

भारताच्या रमन लांबाचा मृत्यूही अशाच प्रकारचा या आधी अनेक देशांच्या खेळाडूंनी अशा प्रकारे आपला जीव गमावला आहे. यात भारताचा फलंदाज रमन लांबाचा समावेश होतो. चार कसोटी सामने आणि 32 एकदिवसीय सामने खेळलेल्या रमन लांबाचा 1988 साली ढाकातील एका क्लब मॅच दरम्यान क्षेत्ररक्षण करताना चेंडू डोक्याला लागल्याने मृत्यू झाला होता.

पहा व्हिडिओ: #Cricket IPLमधल्या दुर्दैवी घटनेनंतर फलंदाजांना हेल्मेट अनिवार्य करण्याची सचिनची ICC ला सूचना

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget