Year Ender 2022: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्टइंडीजचा ( Australia vs West Indies) वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफनं (Alzarri Joseph) खास विक्रमाला गवसणी घातलीय. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स (Most wickets in international cricket in 2022) मिळवण्याचा मान त्यानं मिळवलाय. या वर्षी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 65 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यानं या वर्षी खेळल्या गेलेल्या 17 एकदिवसीय सामन्यात 27 विकेट्स घेतल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अल्झारी जोसेफ अव्वल स्थानी आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा टीम साऊथी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 62 विकेट्सची नोंद आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ट्रेन्ट बोल्टनं यंदाच्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 55 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यानंतर नेपाळचा लामिछानेनं 54 विकेट्ससह चौथ्या आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा 53 विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.

2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स:

क्रमांक गोलंदाज विकेट्स 
1 अल्झारी जोसेफ 65
2 टीम साऊथी 62
3 ट्रेन्ट बोल्ट 55
4 संदीप लामिछाने 54
5 कागिसो रबाडा 53

वेस्टइंडीचा प्रमुख गोलंदाज
जोसेफनं 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो वेस्ट इंडीजच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. त्यानं कॅरेबियन संघासाठी आतापर्यंत 10 टी20 सामने खेळले आहेत. ज्यात 7.47 च्या इकॉनामी रेटनं 16 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान, त्यानं चार वेळा चार किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाचा संघ:
डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड. 

वेस्ट इंडीजचा संघ:
क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), टॅगेनारिन चंद्रपॉल, शमारह ब्रूक्स, जर्मेन ब्लॅकवुड, डेव्हॉन थॉमस, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकिपर), रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, अँडरसन फिलिप, मार्किनो मिंडले. 

हे देखील वाचा-