India vs Bangladesh, 3rd ODI : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 10 डिसेंबर रोजी चट्टोग्राम येथे होणार आहे. बांगलादेशने या मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण तरीदेखील अखेरचा सामना जिंकून भारत किमान व्हाईट वॉश मिळण्यापासून वाचण्याकरता मैदानात उतरेल. पण या सामन्यापूर्वीच टीम इंडियासाठी मोठा धक्का म्हणजे संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. अशा स्थितीत शेवटच्या वनडेत संघाचा कर्णधार म्हणून केएल राहुल (KL Rahul) मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी रोहित शर्माच्या जागी भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ईशान किशन, रजत पाटीदार किंवा राहुल त्रिपाठीला संधी मिळू शकते.


रोहितच्या अनुपस्थितीत संघाच्या ओपनिंगची कमान कोणाकडे सोपवली जाणार याबाबत सातत्याने चर्चा होत आहे. समोर येणाऱ्या माहितीनुसार, रोहित दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर ईशान किशन, रजत पाटीदार किंवा राहुल त्रिपाठी यांना संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. एकीकडे या जागेसाठी ईशान किशनचे नाव आघाडीवर आहे, तर राहुल त्रिपाठी आणि रजत पाटीदारही पदार्पणाच्या प्रतिक्षेत आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल रोहित शर्माऐवजी संघात कोणाचा समावेश करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


कुलदीप सेनसह दीपक चाहरही बाहेर


रोहित शर्माशिवाय भारताचा युवा वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आणि दीपक चाहर हेही बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडले आहेत. दोन्ही खेळाडू दुखापतीशी झुंजत आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडिया तिसऱ्या वनडेत शाहबाज अहमदला संधी देऊ शकते. या मालिकेच्या पहिल्या सामन्यातच शाहबाजला अक्षर पटेलच्या जागी खेळण्याची आणि भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. याशिवाय तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही विराट कोहली शिखर धवनसह टीम इंडियासाठी सलामीची जबाबदारी सांभाळू शकतो.


तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघ:


केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, उमरान मलिक, कुलदीप यादव.



बांगलादेशचा संघ:


लिटन दास (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, यासिर अली, शकीब अल हसन, महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, अफिफ हुसैन ध्रुबो, इबादोत हुसेन, अनामूल हक, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), नुरुल हसन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, मुस्तफिजुर रहमान, आणि तस्किन अहमद.



हे देखील वाचा-