IND vs BAN: ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियम (Shere Bangla National Stadium) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला बांगलादेशकडून (India vs Bangladesh) पाच धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यातील पराभवासह भारत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेत 2-0 नं पिछाडीवर गेलाय. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यातील सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांचे हात बांधून ठेवले. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी खूप धावा खर्च केल्या. यावरून पाकिस्तानच्या माजी गोलंदाज दानिश कनेरियानं (Danish Kaneria) भारताच्या गोलंदाजांवर टीकास्त्र सोडलं. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं थर्ड क्लास गोलंदाजी केल्याची त्यानं म्हटलंय.
दानिश कनेरिया काय म्हणाला?
दानिश कनेरियानं त्याच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, बांगलादेशच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली तर, भारताची गोलंदाजी थर्ड क्लास होती. हे कठोर आहे पण भारतीय क्रिकेट कुठं चाललं आहे ते पाहावं लागेल. खेळपट्टी घरेलू मैदानासारखीच होती. पण तरीही भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. भारतीय गोलंदाज शॉर्ट पिच गोलंदाजी करत होते. कोणत्याही गोलंदाजांनी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला नाही. मोहम्मद सिराजनं खूप धावा खर्च केल्या. त्याच्याकडं गती आहे. पण तरीही त्यानं निराशाजनक गोलंदाजी केली.
भारताची गोलंदाजी
दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होते. भारतीय गोलंदाजानं 19व्या षटकात 69 धावांवर बांगलादेशचे सहा फलंदाज माघारी धाडले. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाज संघर्ष करताना दिसले. मेहंदी हसन आणि महमुदुल्ला यांनी संघाचा डाव सावरला. त्यांनी सातव्या विकेटसाठी 148 धावांची विक्रमी भागिदारी केली. मेहंदी हसनच्या शतकी आणि महमुदुल्लाहच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशच्या संघानं भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं. या दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी खूप धावा खर्च केल्या. मोहम्मद सिराजनं 7.30 इकोनॉमीनं 10 षटकात 73 धावा दिल्या. याशिवाय, उमरान मलिकनं 10 षटकांत 58 धावा दिल्या. दोन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, अक्षर पटेलनं 7 षटकांत 40 धावा आणि शार्दुल ठाकूरनं 10 षटकांत 47 धावा दिल्या.
अखरेच्या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवचा संघात समावेश
कुलदीप सेननं पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर पाठीच्या दुखापतीची समस्या जाणवत असल्याची आल्याची तक्रार केली होती. त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकानं त्याची तपासणी केली. तसेच त्याला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विश्रांतीचा सल्ला देण्यात आला. कुलदीपला स्ट्रेस इंजरीचं निदान झाले असून तो मालिकेतून बाहेर पडला आहे. याचबरोबर दीपक चहरला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान डाव्या हाताच्या दुखापतीचा त्रास झाला. ज्यामुळं त्यालाही एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर पडला. कुलदीप आणि दीपक दोघेही आता त्यांच्या दुखापतींच्या पुढील व्यवस्थापनासाठी एनसीएकडे अहवाल देतील. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं कुलदीप यादवचा तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात समावेश केलाय
हे देखील वाचा-