Asian Games 2023: नेपाळविरोधात ऋतुराजचे शिलेदार कोणते? पाहा संभाव्य प्लेईंग 11
India's Predicted Playing 11: आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारत आणि नेपाळ यांच्यात क्रिकेटचा सामना होणार आहे.
India's Predicted Playing 11: आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारत आणि नेपाळ यांच्यात क्रिकेटचा सामना होणार आहे. नेपाळ संघाने साखळी सामन्यात दमदार कामगिरी करत उप उपांत्य फेरीत प्रवेश केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत ऋतुराज गायकवाड भारतीय संघाची धुरा सांभाळत आहे. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी युवा टीम इंडिया चीनमध्ये दाखल झाली आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड सलामीच्या सामन्यात कोणत्या ११ शिलेदारासह मैदाात उतरणार..... याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. संभाव्या ११ शिलेदारांबद्दल जाणून घेऊयात...
ऋतुराज गायकवाडच्या संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा सर्वच क्रीडा चाहत्यांना आहे. हरमनप्रीत कौरच्या संघाने महिला क्रिकेट स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलेय. आता ऋतुराज गायकवाडच्या संघाचा सुवर्णपदक पटकावण्याचा नंबर असेल. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता भारत आणि नेपाळ यांच्यातील लढत होईल.
नेपाळ क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. नेपाळच्या फलंदाजाने अवघ्या नऊ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याशिवाय सर्वात वेगवान शतकाचा विक्रमही केला. इतकेच काय तर टी20 मध्ये सर्वाधिक धावा चोपण्याचा पराक्रमही नेपाळ संघाने केला आहे. पण आता नेपाळसमोर तगड्या टीम इंडियाचे मजबूत आव्हान असेल.
सलामीला ऋतुराजसोबत कोण उतरणार ?
भारताचे पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळणाऱ्या ऋतुराज गायकवाडसाठी ११ शिलेदारांची निवड करणे सोपे नसेल. प्लेइंग इलेव्हनमध्ये सलामीवीर म्हणून कर्णधार ऋतुराज गायकवाड असेलच. पण त्याच्या जोडीला दुसरा सहकारी कोण? यशस्वी जायस्वाल याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तिसऱ्या क्रमांकावर डावखुरा तिलक वर्मा फलंदाजीला उतरेल.
मध्यक्रममध्ये कोण कोण ?
त्यानंतर शिवब दुबे आणि विकेटकिपर म्हणून जितेश शर्मा याला प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळेल. रिंकू सिंह, वॉशिंगटन सुंदर यांनाही प्लेईंग ११ मध्ये जागा मिळू शकते. रिंकूने भारताकडून आयर्लंड दौऱ्यावर पदार्पण केले. जितेश शर्मा टीम इंडियाकडून पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्यानंतर फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर सहाव्या क्रमांकावर दिसणार हे नक्की. रिंकू सिंगला फिनिशर म्हणून संधी मिळू शकते.
गोलंदाजीत कोण कोण -
फिरकीची धुरा रवि बिश्नोई सांभाळेल. त्याच्याजोडीला वॉशिंगटन सुंदर असेलच... तर वेगवान गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंह, आवेश खान आणि मुकेश कुमार यांचा समावेश असेल. मुकेश कुमार याने वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघात पदार्पण केले आहे.
नेपाळविरोधात टीम इंडियाची प्लेईंग ११
ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), यशस्वी जयासवाल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रिंकू सिंह, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार.