Asia Cup 2023 : आशिया चषकाला आजपासून दिमाखात सुरुवात झाली आहे. भारतीय संघही आशिया चषकासाठी श्रीलंकेत दाखल झाला आहे. बेंगेलोर येथीन एनसीएमध्ये टीम इंडियाच्या शिलेदारांनी आठवडाभर तयारी केली. त्यानंतर संपूर्ण संघ आज दुपारी श्रीलंकेसाठी रवाना झाला. केएल राहुल बेंगलोरमध्येच दुखापतीवर काम करणार आहे. आशिया चषकातील पहिले दोन सामने टीम इंडिया राहुलशिवाय खेळणार आहे. त्यामुळे पाचव्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार ? हा प्रश्न उपस्थित झालाय. ईशान किशन सलामीला खेळणार की मध्यक्रम? याबाबतही अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. आशिया चषकासाठी भारतीय संघ श्रीलंकामध्ये दाखल झाला आहे. विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह संघातील सर्वच सहकारी श्रीलंकेत पोहचले आहे. तिलक वर्मा आणि रविंद्र जाडेजा यांनी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले होते.
आशिया चषकात भारताचा पहिला सामना शनिवारी पाकिस्तानविरोधात होणार आहे. त्याआधी भारतीय संघ दोन दिवस सराव करणार आहे. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी तिलक वर्मा आणि रविंद्र जाडेजा यांनी फ्लाईटमधील फोटो पोस्ट केले आहेत. तिलक वर्मा याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये कुलदीप यादव आणि सूर्यकुमार यादवही दिसत आहेत. तिलक वर्माने कॅप्शनमद्ये श्रीलंका असे लिहिलेय. तिलक वर्माच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स अन् लाईक्सचा वर्षाव केलाय. रविंद्र जाडेजानेही इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केलाय, त्यामध्ये श्रीलंकेला रवाना होत असल्याचा उल्लेख केला आहे.
आशिया चषकासाठी टीम इंडियामध्ये तिलक वर्मा याला संधी दिली आहे. तिलक वर्मा याने वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये टी20 मध्ये दमदार कामगिरी केली होती. तिलक वर्मा याने पदार्पणातच सर्वांना प्रभावित केले. आशिया चषकात तिलक वर्मा याचे वनडेमध्ये पदार्पण होण्याची शक्यता आहे. तिलक वर्माने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याची टीम इंडियात वर्णी लागली. तिलक वर्मा भारतासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो.
आशिया चषकासाठी भारताचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकिपर, दुखापतीमुळे दोन सामन्याला मुकणार), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (विकेटकिपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप विकेटकिपर)