Litton Das Ruled out Asia Cup 2023 : आशिया चषकाला आजपासून दिमाखात सुरुवात झाली आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यामध्ये सलामीची लढत सुरु झाली आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेपाळच्या गोलंदाजांनी यजमान पाकिस्तानच्या सलामी फलंदाजांना स्वस्तत तंबूत पाठवले. आशिया चषकाच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज लिटन दास स्पर्धेतून बाहेर गेला आहे. विकेटकीपर फलंदाज लिटन दास हा तापाने (व्हायरल फिवर) फणफणला आहे. त्यामुळे लिटन दास बांगलादेश संघासोबत आशिया चषकासाठी रवाना झाला नाही. लिटन दासच्या अनुपस्थितीत अनामुल हक याला संघात स्थान देण्यात आले आहे.
लिटन दास याने बांगलादेशच्या आघाडीच्या खेळाडूमध्ये गनला जातो. त्याने आतापर्यंत 72 वनडे सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. 72 सामन्यात लिटन दास याने 2213 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान लिटन दास याने पाच शतके आणि 10 अर्धशतके ठोकली आहेत. 176 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आशिया चषकाआधी व्हायरल फिवर आला होता, त्यामधून लिटन अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे तो आशिया चषकाला मुकणार आहे. त्याच्या ऐवजी अनामुल हक या युवा खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
लिटन दास याच्या अनुपस्थितीत बांगलादेश संघात अनामुल हक याला स्थान मिळाले आहे. विकेटकीपर फलंदाज अनामुळ याने आतापर्यंत 44 वनडे सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने 1254 धावा चोपल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या 120 इतकी आहे. अनामुल हक याने 20 टी 20 सामन्यात 445 धावा चोपल्या आहेत. अनामुल याने बांगलादेशसाठी अखेरचा सामना डिसेंबर 2022 मध्ये खेळला होता. त्यानंतर तो संघाबाहेर होता. पण लिटन दास स्पर्धेबाहेर गेल्यामुळे अनामुल याला पुनरागमनाची संधी मिळाली आहे.
आशिया कप 2023 साठी बांगलादेशचा संघ -
शाकिब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसैन शांतो, तौहीद हृदोय, मुश्फिकुर रहीम, अफीफ हुसैन ध्रुबो, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम, नसुम अहमद, महेदी हसन, नईम शेख , शमीम हुसैन, तंजीद हसन तमीम, तंजीम हसन साकिब, अनामुल हक बिजॉय