एक्स्प्लोर

Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तानचा थरार पाहा फुकटात, Live Streaming बद्दल सर्व माहिती

IND vs PAK Asia Cup 2023 : पाकिस्तानने सलामीच्या लढतीत नेपाळचा पराभव करत स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली. भारताचा आशिया चषकातील हा पहिलाच सामना असेल.

IND vs PAK Asia Cup 2023 Live Streaming : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकातील सामना शनिवारी होणार आहे. पाकिस्तानने सलामीच्या लढतीत नेपाळचा पराभव करत स्पर्धेची सुरुवात दणक्यात केली. भारताचा आशिया चषकातील हा पहिलाच सामना असेल. नेपाळविरोधात २३८ धावांनी विजय मिळवणाऱ्या पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असेल. पण भारतीय संघही कमालीचा फॉर्मात आहे. जसप्रीत बुमराह आणि अय्यरच्या आगमनामुळे टीम इंडियाची ताकद वाढली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार फुकटात पाहायची संधी आहे.

2019 नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय सामना होत आहे. २०१९ च्या विश्वचषकात अखेरीस भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने बाजी मारली होती. आशिया चषकात भारतीय संघ संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे.  आगामी एकदिवसीय विश्वचषकापूर्वी सर्व खेळाडूंची चाचपणी करण्याची ही एक उत्तम संधी असेल. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माशिवाय विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतील. 

कुठे होणार सामना  ? -  

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ज्या मैदानावर सामना झाला तिथेच भारत आणि पाकिस्तानची लढत होणार आहे. कँडी येथील पल्लेकेले स्टेडियमची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत करते.

 किती वाजता सुरु होणार ? 

भारतीय वेळेनुसार, दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. दुपारी अडीच वाजता नाणेफेक होईल.

फुकटात पाहा सामना - 

टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणारा महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होलटेज सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी असेल. तुमच्या मोबाईलमध्ये हॉटस्टारचे अॅप असेल तर तुम्ही मोफत सामना पाहू शकता तुम्हाला कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही.  त्याशिवाय एबीपी माझाच्य संकेतस्थळावर सामन्यासंदर्भात सर्व माहिती तुम्हाला मिळेल.

पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग 11

इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी 

भारताची संभाव्य प्लेईंग 11 

ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा(कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget