एक्स्प्लोर

Asia Cup 2023 : रोहित-विराट जोडीचा नाद खुळा, दोन धावा करताच सचिन-गांगुलीच्या पंक्तीत होणार सामील

Virat Kohli - Rohit Sharma as a pair in ODI: रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने वनडेमध्ये धावांचा पाऊस पाडलाय.

Virat Kohli - Rohit Sharma as a pair in ODI: रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने वनडेमध्ये धावांचा पाऊस पाडलाय. या जोडीला आणखी एक विक्रम करण्याची संधी असेल. विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने दोन धावांची भागिदारी केल्यास पाच हजार धावा पूर्ण करणार आहेत. या जोडीने आतापर्यंत 85 डावात 62.47 च्या सरासरीने 4998 धावांची भागिदारी केली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये 18 शतकी भागिदारी आणि 15 अर्धशतकी भागिदारी आहेत. पाकिस्तानविरोधातील सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये पाच हजार धावांच्या भागिदारीचा विक्रम होऊ शकतो. 

शनिवारी आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. यामध्ये टीम इंडियाचे दोन प्रमुख खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील. या दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत सर्वोउत्कृष्ट कामगिरी केली आहे. शनिवारी रोहित आणि विराटची जोडी पाच हजार धावांची भागिदारी करण्यापासून दोन पावले दूर आहे. दोघांची दोन धावांची भागिदारी होताच पाच हजार धावांच्या भागिदारीचा विक्रम रोहित-विराट जोडीच्या नावावर होणार आहे. 

वनडे फॉरमॅटमध्येटीम इंडियासाठी आतापर्यंत केवळ 2 जोड्यांनी 5000 धावांचा टप्पा पार पार केला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली, रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी वनडेमध्ये 8227 धावांची भागिदारी केली आहे. तर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी 5193 धावांची भागिदारी केली आहे. जर रोहित आणि विराट पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी करण्यात यशस्वी ठरले तर ते हा टप्पा गाठणारी सर्वात जलद जोडी बनतील.
 
रोहित दहा हजार धावसंख्येच्या जवळ -
भारतीय कर्णधार रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यापासून 163 धावा दूर आहे. हा टप्पा गाठणारा रोहित हा दुसरा वेगवान खेळाडू ठरू शकतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10,000 धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे, जो त्याने 205 डावांमध्ये पूर्ण केला. रोहितने आतापर्यंत 237 डावात 9837 धावा केल्या आहेत.

विराट १३ हजार धावांचा टप्पा पार करणार

वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 13 हजार धावा करण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला फक्त 102 धावांची गरज आहे. सचिन तेंडुलकर याने 321 वनडे डावात 13 हजार धावांचा पल्ला पार केला. सचिन तेंडुलकरचा 13 हजार धावांचा पल्ला पार करण्यासाठी 321 डाव लागले होते, विराट कोहलीला हा विक्रम मोडण्यासाठी 22 डाव असतील. विराट कोहलीने 265 डावांमध्ये 12898 धावा चोपल्या आहेत. विराट कोहली आशिया चषकात वेगवान 13 हजार धावांचा पल्ला पार करण्याची संधी आहे. 102 धावा करताच सचिन तेंडुलकरचा विक्रम विराट कोहली मोडणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget