एक्स्प्लोर

Asia Cup 2023 Final : कोण जिंकणार आशिया चषक, भाराताची युवा ब्रिगेड अन् पाकिस्तान अ यांच्यामध्ये आज लढत

ACC Emerging Men’s Asia Cup 2023 Final :  इमर्जिंग एशिया कपच्या फायनलमध्ये आज भारत अ संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान अ संघाविरुद्ध जेतेपदासाठी खेळणार आहे.

ACC Emerging Men’s Asia Cup 2023 Final :  इमर्जिंग एशिया कपच्या फायनलमध्ये आज भारत अ संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान अ संघाविरुद्ध जेतेपदासाठी खेळणार आहे. भारतीय संघ चांगल्या फॉर्ममुळे विजयाचा दावेदार मानला जात आहे. भारताने बांगलादेशचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला तर पाकिस्तानने श्रीलंका संघाविरोधात विजय मिळवत फायनलचे तिकिट मिळवले. बुधवारी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यात  भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लढत होणार आहे. यामध्ये कोण बाजी मारत आशिया चषकावर नाव कोरतेय, हे पाहणं औत्सुक्याचे आहे.  या सामन्याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात थरार-

इमर्जिंग एशिया कप स्पर्धेत भारताने निर्वादित वर्चस्व मिळवले आहे. आतापर्यंत भारताला एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नाही.  बांगलादेशचा पराभव करत भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. साई सुदर्शन, यश धुल आणि अभिषेक शर्मा यांनी फलंदाजी मोठे योगदान दिलेय. हर्षित राणा आणि राजवर्धन हंगरकेकर, निशांत सिंधू आणि मानव सुतार यांनी भेदक मारा केला. युएई आणि नेपाळ दोन्ही संघांना भारतीय गोलंदाजांनी ऑलआऊट केले होते. पाकिस्तान विरोधातही साखळी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. आता फायनलमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. 

पाकिस्ताननेही या स्पर्धेत दमदार कामगिरी करत फायनलचे तिकिट मिळावलेय. मोहम्मद वासिम आणि शहनवाज धानी यांनी मोठे योगदान दिलेय. कासिम अक्रम या 20 वर्षीय खेळाडूनेही आपल्या कामगिरीने प्रभावित केलेय.  कासिम अक्रम याच्या गोलंदाजीचा सामना करणे भारतीय फलंदाजांसाठी मोठं आव्हान असेल. त्याशिवाय एस फरहान Sahibzada Farhan आणि कामरान गुलाम यांनीही आपल्या कामगिरीने प्रभावित केलेय. या स्पर्धेत पाकिस्तान संघाला फक्त भारताविरोधात पराभवाचा सामना करावा लागला, हा अपवाद वगळता पाकिस्तानने प्रत्येक सामन्यात विजय मिळवलाय.

कुठे आणि कधी होणार सामना ?

भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यातील इमर्जिंग एशिया कपमधील फायनल सामना श्रीलंका येथील कोलंबोच्या (R. Premadasa Stadium, Colombo) मैदानात होणार आहे. रविवारी दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणता संघ बाजी मारणार ? याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागलेय. 

कुठे पाहता येणार सामना ?

इमर्जिंग एशिया कप 2023 मध्ये होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. हा सामना फॅनकोड अॅप आणि संकेतस्थळावर पाहाता येणार आहे. त्याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरच्या चॅनलवरही (Star Sports Network) हा सामना चाहत्यांना पाहता येईल. 

IND vs PAK: Squads

India A: Sai Sudharsan, Abhishek Sharma (vc), Nikin Jose, Pradosh Ranjan Paul, Yash Dhull (c), Riyan Parag, Nishant Sindhu, Prabhsimran Singh (wk), Dhruv Jurel (wk), Manav Suthar, Yuvrajsinh Dodiya, Harshit Rana, Akash Singh, Nitish Kumar Reddy, Rajvardhan Hangargekar, Harsh Dubey, Nehal Wadhera, Snell Patel, Mohit Redkar

Pakistan A: Mohammad Haris (c & wk), Omair Bin Yousuf (vc), Amad Butt, Arshad Iqbal, Haseebullah, Kamran Ghulam, Mehran Mumtaz, Mubasir Khan, Mohammad Wasim Jnr, Qasim Akram, Sahibzada Farhan, Saim Ayub, Shahnawaz Dahani, Sufiyan Muqeem and Tayyab Tahir

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget