Ind vs Pak, Asia Cup 2022: आशिया चषकाला काहीच दिवस शिल्लक उरले आहेत. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) दुखापतीमुळं आशिया चषकातून बाहेर झालाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) याबाबत माहिती दिली. गुडघ्याच्या दुखापतीमुळं त्याला आशिया चषक (Asia Cup 2022) आणि इंग्लंडविरुद्ध मालिकेला (England Tour Of Pakistan) मुकावं लागलंय. यामुळं शाहीन आफ्रिदीच्या रुपात मोठा झटका बसलाय. 


यापूर्वी भारताचे दोन आघाडीचे गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतींमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्याचवेळी आफ्रिदीला स्पर्धा सुरू होण्याच्या आठवडाभरापूर्वी दुखापत झाल्यानं पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. मात्र, आफ्रिदीच्या आशिया चषकात अनुपस्थित राहिल्यानं भारतीय फलंदाजाला मोठा दिलासा मिळालाय, असं मत पाकिस्तानचं माजी दिग्गज खेळाडू वकार युनूस यांनी व्यक्त केलं. त्याने केलेल्या या ट्विटवर चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीका केली असून आता भारताचा दिग्गज इरफान पठाणनेही या वादात उडी घेतली आहे.


भारत-पाकिस्तानच्या दिग्गजांमध्ये रंगलंय शाब्दिक युद्ध
वकार युनूसनं ट्विटमध्ये म्हटलंय की, "शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीमुळं आघाडीच्या फलंदाजाला मोठा दिलासा मिळालाय. त्याला आम्हाला आशिया चषकात पाहता येणार आहे, हे दु:खद आहे. लवकर बरा हो चॅम्प!" यावर इरफान पठाणनं प्रतिक्रिया दिलीय. “जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल या आशिया कपमध्ये खेळत नाहीत ही इतर संघांसाठी दिलासादायक गोष्ट आहे!


पीसीबीनं निवेदनात काय म्हटलं?
पाकिस्तान बोर्डानं निवेदनात असं म्हटलंय की, "शाहीन आफ्रिदीला टी-20 आशिया चषक आणि इंग्लंडविरुद्धच्या सात सामन्यांच्या टी-20 मालिकेतून वगळण्यात आले. न्यूझीलंडमध्ये रंगणाऱ्या तिरंगी मालिकेत तो संघात परतेल." शाहीनला गेल्या महिन्यात गाले येथे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटीदरम्यान उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुबईत होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहेत.


आशिया चषकासाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.


हे देखील वाचा-