India tour of Zimbabwe: भारत आणि झिब्बावे (ZIM Vs IND) यांच्यात हेरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये (Harare Sports Club) खेळण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय संजू सॅमसननं (Sanju Samson) दमदार खेळी केली. या सामन्यात संजू सॅमसननं 39 चेंडूत नाबाद 43 धावांची खेळी केली. ज्यात तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. या सामन्यात संजू सॅमसननं 110.26 स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली. ज्यामुळं त्याला सामनावीर (Man Of The Match) म्हणून गौरवण्यात आलंय. या पुरस्कारासह त्याची खास क्लबमध्ये एन्ट्री केलीय. परदेशात सामनावीरीचा पुरस्कार जिंकणारा तो पाचवा भारतीय विकेटकीपर ठरलाय. परदेशात सर्वाधिक सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय विकेटकिपरच्या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) अव्वल स्थानी आहे.

 

महेंद्र सिंह धोनीनं सर्वाधिक वेळा म्हणजेच पाच वेळा परदेशात सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. त्यानंतर भारताचा युवा विकेटकिपर ऋषभ पंतनं एक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. या यादीत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि फारूख इंजिनिअर यांचाही समावेश आहे. आता या खास यादीत संजू सॅमसनचाही समावेश झालाय. 

 

सचिन तेंडुलकर सामनावीर पुरस्काराचा बादशाह

क्रिकेट विश्वात सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अव्वल स्थानी आहे. सचिननं त्याच्या कारकिर्दीत तब्बल 62 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. त्यानंतर 48 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, भारताचा माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. कोहलीला 36 वेळा या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग आणि शाहीद आफ्रिदी यांनी 32-32 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकलाय. 

 

झिम्बाब्वे दौऱ्यात भारताची दमदार कामगिरी

भारतानं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यात झिम्बाब्वेचा संघ 161 धावा करून सर्वबाद झाला होता. यानंतर भारतानं पाच विकेट्स राखून सामना जिंकला. भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

 

हे देखील वाचा-