Dinesh Karthik in IND vs AFG : टीम इंडियाचा आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मधील अखेरचा सामना भारताने अफगणिस्तानविरुद्ध 101 धावांनी जिंकला, यावेळी विराट कोहलीनं पहिलं-वहिलं टी20 शतक ठोकत जवळपास 3 वर्षानंतर शतक ठोकलं. दरम्यान या शतकाने सर्वांचं लक्ष वेधलं असताना आणखी एक स्पेशल गोष्ट या सामन्यावेळी झाली. ती म्हणजे  भारतीय संघातील सर्वांत अनुभवी खेळाडूंपैकी एक दिनेश कार्तिनं सामन्यातील अखेरचं षटक गोलंदाजी करत सर्वांना चकित केलं. कार्तिक मागील 18 वर्षे टी20 सामने खेळत असला तरी त्याने आजवर गोलंदाजी केली नव्हती. पण यंदाच्या आशिया कपमध्ये पहिल्यांदाच गोलंदाजी केली आहे.

भारताने सामन्यात प्रथम फलंदाजी करत 212 धावांचं विराट लक्ष्य उभारलं. ज्याच पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ असा काही ढेपाळला की 21 धावांवर त्यांचे 6 गडी बाद झाले होते. अशात त्यानंतर अखेरचं शतक येईपर्यंत त्यांना 100 हून अधिक धावांची गरज होती. तसंच भारताचं स्पर्धेतील आव्हानही संपलं असल्याने नेट-रनरेट किंवा कोणत्या गोष्टीचा खास फरक पडणार नसल्याने भारताने गोलंदाजी दिनेश कार्तिककडे सोपवली. त्याने फिरकी गोलंदाजी केली पण त्याला अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी 18 धावा ठोकल्या. तरीदेखील भारत 101 धावांनी जिंकला. पण कार्तिकच्या गोलंदाजींनं सर्वांनाच चकित केलं.

पाहा दिनेश कार्तिकची बोलिंग-

सामन्यांचं संपूर्ण स्कोरकार्ड

अफगाणिस्तानची फलंदाजी -

हजरतुल्लाह जजई एलबीडब्ल्यू बोल्ड भुवनेश्वर कुमार 0 4 0 0
रहमानुल्लाह गुरबाज बोल्ड भुवनेश्वर कुमार 0 1 0 0
इब्राहिम जादरान नाबाद 64 59 4 2
करीम जनत कॉट विराट कोहली बोल्ड भुवनेश्वर कुमार 2 4 0 0
नजीबुल्लाह जादरान एलबीडब्ल्यू बोल्ड भुवनेश्वर कुमार 0 2 0 0
मोहम्मद नबी एलबीडब्ल्यू बोल्ड अर्शदीप सिंह 7 7 1 0
अजमतुल्लाह ओमरज़ाई कॉट दिनेश कार्तिक बोल्ड भुवनेश्वर कुमार 1 6 0 0
राशिद खान कॉट अक्षर पटेल बोल्ड दीपक हूडा 15 19 2 0
मुजीब उर रहमान बोल्ड रविचंद्रन अश्विन 18 13 2 1
फरीद अहमद नाबाद 1 5 0 0
फज़ल हक    

भारताची गोलंदाजी 

BOWLING O M R W
भुवनेश्वर कुमार 4 1 4 5
दीपक चाहर 4 0 28 0
अर्शदीप सिंह 2 0 7 1
अक्षर पटेल 4 0 24 0
रविचंद्रन अश्विन 4 0 27 1
दीपक हूडा 1 0 3 1
दिनेश कार्तिक 1 0 18 0

भारताची फलंदाजी -

Batting R B 4s 6s
लोकेश राहुलझे नजीबुल्लाह जद्रान गो फरीद अहमद 62 41 6 2
विराट कोहलीनाबाद 122 61 12 6
सूर्यकुमार यादवत्रिफळाचीत फरीद अहमद 6 2 0 1
ॠषभ पंतनाबाद 20 16 3 0
दीपक हूडा        
दिनेश कार्तिक        
अक्षर पटेल        
रविचंद्रन अश्विन        
दीपक चाहर        
भुवनेश्वर कुमार        
अर्शदीप सिंह

अफगाणिस्तानची गोलंदाजी

BOWLING O M R W
फजल हक 4 0 51 0
मुजीब उर रहमान 4 0 29 0
फरीद अहमद 4 0 57 2
रशीद खान 4 0 33 0
मोहम्मद नबी 3 0 34 0
अझमतुल्ला ओमरझाई 1 0 8 0

हे देखील वाचा-