ICC T20 World Cup 2022 : आगामी टी20 विश्वचषकाला महिनाभर शिल्लक असून आयसीसीने विश्वचषकाच्या सामन्यांआधी वॉर्म-अप सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध सामने खेळणार आहे. दरम्यान विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीसाठी पात्र संघ जसेकी भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान हे आपले वॉर्म-अप सामने 17 आणि 19 ऑक्टोबर रोजी खेळणार आहेत. तर नेमकं वेळापत्रक कसं आहे पाहूया...
कसं आहे वेळापत्रक?
तारीख | सामना | ठिकाण |
10 ऑक्टोबर | वेस्ट इंडीज विरुद्ध युएई | जंक्शन ओव्हल |
10 ऑक्टोबर | स्कॉटलंड विरुद्ध नेदरलंड | जंक्शन ओव्हल |
10 ऑक्टोबर | श्रीलंका विरुद्ध झिम्बाव्बे | एमसीजी |
11 ऑक्टोबर | नामिबिया विरुद्ध आयर्लंड | एमसीजी |
12 ऑक्टोबर | वेस्ट इंडीज विरुद्ध नेदरलंड | एमसीजी |
13 ऑक्टोबर | झिम्बाव्बे विरुद्ध नामिबिया | जंक्शन ओव्हल |
13 ऑक्टोबर | श्रीलंका विरुद्ध आयर्लंड | जंक्शन ओव्हल |
13 ऑक्टोबर | स्कॉटलंड विरुद्ध युएई | एमसीजी |
17 ऑक्टोबर | ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत | द गाबा |
17 ऑक्टोबर | न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका | अॅलन बॉर्डर फिल्ड |
17 ऑक्टोबर | इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान | द गाबा |
17 ऑक्टोबर | अफगाणिस्तान विरुद्ध बांग्लादेश | अॅलन बॉर्डर फिल्ड |
19 ऑक्टोबर | अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान | द गाबा |
19 ऑक्टोबर | बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका | अॅलन बॉर्डर फिल्ड |
19 ऑक्टोबर | न्यूझीलंड विरुद्ध भारत | द गाबा |
टी-20 विश्वचषक 2022 साठी16 संघ पात्र
आगामी टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, नामिबिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका , वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि यूएईनं आधीच आपलं स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर आता नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांनी क्वालिफायर टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत पोहोचून टी-20 विश्वचषकात 2022 मध्ये आपली जागा पक्की केलीय.
कोणकोणत्या शहरात पार पडणार टी-20 विश्वचषकातील सामने?
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-