Queen Elizabeth II Pasess Away: ब्रिटिश सत्तेचा सुवर्णकाळ आणि अस्ताला जाणाऱ्या साम्राज्याच्या साक्षीदार आणि ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर सात दशके विराजमान असणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं गुरूवारी वृद्धपकाळानं निधन झालं. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर इंग्लंडमध्ये राष्ट्रीय शोक घोषित करण्यात आलाय. ज्यामुळं इंग्लंडमध्ये शुक्रवारी खेळले जाणारे सर्वप्रकारचे खेळ रद्द करण्यात आले आहेत. ज्यात क्रिकेट, फुटबॉल, रग्बी, टेनिस , फॉर्मुला-1 आणि सायकलिंग यांसारख्या खेळांचा समावेश आहे.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 8 सप्टेंबरपासून कसोटी सामना खेळला जात आहे. लंडनमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ रद्द करण्यात आलाय. महत्वाचं म्हणजे, पावसामुळं या कसोटीचा पहिला दिवस रद्द करण्यात आला होता. क्रिकेटसह हॉर्स रेसिंग, आणि गोल्फसह सर्व खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं (ECB) ओव्हल कसोटीसह देशात होणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या टुर्नामेंट आणि सामने रद्द करण्याची घोषणा केलीय. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. ही मालिका 1-1 नं बरोबरीत आहे. या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना लंडन येथे खेळला जात आहे. परंतु, या सामन्यातील पहिले दोन दिवस रद्द झाल्यानं कसोटी मालिका बरोबरीत सुटण्याची शक्यता आहे.
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वडील किंग जॉर्ज यांच्या निधनानंतर म्हणजेच 70 वर्षांपूर्वी भारतात राष्ट्रीय शोक घोषित करण्यात आला होता. किंग जार्ज यांचं निधन 6 फेब्रुवारी 1952 मध्ये झालं होतं. त्यावेळी इंग्लंडचा संघ चेन्नई येथे भारतात कसोटी सामना खेळत होता. किंग जार्ज यांच्या निधनाच्या दुसऱ्या दिवशी 7 फेब्रुवारीला या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस होता. किंग जार्ज यांच्या मृत्युनंतर एलिझाबेथ द्वितीय महाराणी बनल्या. त्यावेळी त्या 25 वर्षांच्या होत्या.
एलिझाबेथ द्वितीय ही ब्रिटनमध्ये सर्वात जास्त काळ सत्ता गाजवणारी राणी होत्या. त्यांनी 70 वर्षे ब्रिटनच्या राणी होती. त्यांच्या कारकिर्दीत ब्रिटनचं 15 पंतप्रधान बनले. विशेष बाब म्हणजे, एलिझाबेथ केवळ ब्रिटेनचीच नाही तर 15 देशांची राणी होती. त्यात ऑस्ट्रेलिया, कॅनडासारख्या श्रीमंत देशांचाही समावेश आहे.
हे देखील वाचा-