T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची चिंता वाढवणारी माहिती समोर आलीय. भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) टी-20 विश्वचषकाला मुकण्याची शक्यता आहे. आशिया चषक 2022 स्पर्धेदरम्यान रविंद्र जाडेजाच्या गुघड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर तो संघात परत येऊ शकला नाही आणि आशिया चषक 2022 स्पर्धेतून बाहेर पडला. जाडेजा हा भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याचं विश्वचषकातून बाहेर पडणं भारतीय संघासाठी मोठा धक्का असेल.
आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात जाडेजाची सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्यात जाडेजानं पाकिस्तानविरुद्ध 29 चेंडूत 35 धावांची महत्वाची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. परंतु, स्पर्धेदरम्यान रविंद्र जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला. आता त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट्स समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुबईमध्ये एका एडव्हेंचर अॅक्टिविटी करत असताना जडेजाला दुखापत झाली. टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथे जाडेजाला एका वॉटर बेस्ट ट्रेनिंग अॅक्टिव्हिटीत सामील होण्यास सांगितलं गेलं. हॉटेलच्या आवारात असलेल्या बॅकवॉटर फॅसिलिटीत ही अॅक्टिव्हिटी करण्यात आली. जाडेजाला स्की बोर्डवर स्वत:ला पाण्यात बॅलेंस करायचं होतं. ही एक ए़डव्हेंचर अॅक्टिव्हिटी होती आणि बीसीसीआयच्या ट्रेनिंगचा मॅन्युअल भाग नव्हता. याच अॅक्टिव्हिटी दरम्यान रविंद्र जाडेजाचा पाय घसरला आणि त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली.
2022 पासून रवींद्र जाडेजाचा फॉर्म
सध्या रविंद्र जाडेजा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्यानं यावर्षी 9 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं. ज्यात 50.25 च्या सरासरीनं 201 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 141.54 इतका होता. तर, गोलंदाजीत जाडेजाला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्याला फक्त 5 विकेट्स घेता आल्या आहेत.
दुखापतीमुळं वेस्ट इंडीज दौऱ्यातून मुकावं लागलं
आशिया चषकापूर्वी भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातही रविंद्र जाडेजा भारतीय संघाचा भाग नव्हता. उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळं त्याला निवड समितीनं विश्रांती दिल्याचं सांगण्यात आलं होतं.
हे देखील वाचा-