Arshdeep Singh : इंग्लंडच्या फलंदाजांचं काय खरं नाही, अर्शदीप सिंह चेन्नईत इतिहास घडवणार? भारताकडे आघाडी भक्कम करण्याची संधी
Arshdeep Singh : भारतानं पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिली मॅच जिंकली. दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये विजय मिळवत भारताकडे आघाडी भक्कम करण्याची संधी आहे.
चेन्नई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी टी 20 मॅच आज (25 जानेवारी) चेन्नईत होणार आहे. दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये विजय मिळवून आघाडी भक्कम करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. तर, इंग्लंडचा संघ आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत पलटवार करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह यानं पहिल्या टी 20 मॅचमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं होतं. दुसऱ्या टी 20 मध्ये देखील इंग्लंडच्या फलंदाजांपुढं अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीचं आव्हान असेल. अर्शदीप सिंह या मॅचमध्ये इतिहास घडवू शकतो.
टी 20 मध्ये अर्शदीप सिंह इतिहास रचणार?
अर्शदीप सिंहनं आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यांमध्ये आतापर्यंत 97 विकेट घेतल्या आहेत. आजच्या मॅचमध्ये त्यानं 3 विकेट घेतल्या तर टी 20 क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज बनेल अर्शदिप सिंहनं पहिल्या टी 20 मध्ये युजवेंद्र चहलला मागं टाकलं होतं. युजवेंद्र चहलच्या नावावर 96 विकेट आहेत. अर्शदीप सिंहनं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 61 मॅच खेळल्या आहेत. त्यानं 17.90 च्या सरासरीनं आणि 8.24च्या इकोनॉमीनं 97 विकेट घेतल्या आहेत.
अर्शदीप सिंहनं 97 विकेट, युजवेंद्र चहल 96 विकेट, हार्दिक पांड्या 91 विकेट, भुवनेश्वर कुमार 90 विकेट तर जसप्रीत बुमसहानं 89 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीप सिंहनं चेन्नईच्या मॅचमध्ये तीन विकेट घेतल्यास टी 20 क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरणार आहे. यापूर्वी अशी कामगिरी अफगाणिस्तानच्या राशिद खान आणि नेपाळच्या संदीप लामिछाने यानं 54 विकेट घेतल्या.
भारताकडे आघाडी भक्कम करण्याची संधी आहे. भारतीय क्रिकेट संघानं पहिल्या टी 20 मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेतील आघाडी भक्कम करण्याची संधी आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव चेन्नईच्या खेळपट्टीचा विचार करता फिरकी गोलंदाजांना पुन्हा संधी देण्याबाबत विचार करु शकतो. पहिल्या टी 20 मध्ये वरुण चक्रवर्तीनं दमदार कामगिरी केली होती. भारतीय चाहते सूर्यकुमार यादवच्या आक्रमक फलंदाजीची देखील वाट पाहत आहेत.
इंग्लंडचा संघ :
बेन डकेट, फिल सॉल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कॅप्टन), हॅरी ब्रुक, लियम लिविंगस्टोन, जॅकब बेथेल, जेमी ओवरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वुड
संभाव्य भारतीय संघ
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकु सिंह, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई
इतर बातम्या :