एक्स्प्लोर

Anjali Tendulkar: अंजली तेंडुलकरनेही घेतला सरकारी योजनेचा लाभ; विरारमध्ये खरेदी केलं आलिशान घर, किंमत किती?

Anjali Tendulkar Buys Apartment In Virar: भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याची पत्नी अंजली तेंडुलकर हिने मुंबईजवळील विरारमध्ये एक नवीन आलीशान फ्लॅट खरेदी केला आहे.

Anjali Tendulkar Buys Apartment In Virar: भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची पत्नी अंजली तेंडुलकर (Anjali Tendulkar) हिने मुंबईजवळील विरारमध्ये एक नवीन आलीशान फ्लॅट खरेदी केला आहे. विरारमधील पेनिन्सुला हाइट्स नावाच्या इमारतीत अंजली तेंडुलकरने हा फ्लॅट 32 लाख रुपयांना खरेदी केला असून 391 चौरस फूट आकाराचे हे अपार्टमेंट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. 

नोंदणी आणि खर्च-

30 मे 2025 रोजी हा करार अधिकृतपणे नोंदणीकृत झाला. नोंदणी विभागांनुसार, अंजली तेंडुलकरने या मालमत्तेसाठी 1.92 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. महिला खरेदीदार असल्याने, अंजली तेंडुलकरला स्टॅम्प ड्युटीवर 1 टक्के सूट देखील मिळाली. महाराष्ट्र सरकार महिलांना मालमत्ता खरेदी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा लाभ देते. राज्यात स्टॅम्प ड्युटीचा दर सामान्यतः 5 टक्के ते 7 टक्के असतो, जो शहर आणि जिल्ह्यानुसार बदलतो.

विरारमधील मालमत्तेच्या किंमती-

स्थानिक रिअल इस्टेट ब्रोकर्सच्या मते, विरारमधील निवासी मालमत्तेची किंमत प्रति चौरस फूट 6000 ते 9000 रुपयांपर्यंत असते. स्थान, इमारतीच्या सुविधा आणि कनेक्टिव्हिटीनुसार ही किंमत आणखी वाढू शकते. विरार मुंबईच्या उत्तरेकडील भागात येते आणि नवीन मेट्रो कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे येथे गुंतवणूकदारांचा रस सतत वाढत आहे.

तेंडुलकर कुटुंबाची गुंतवणूक- (Anjali Tendulkar Invest Virar)

सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांच्याकडे आधीच मुंबईत आलिशान मालमत्ता आहेत. अशा परिस्थितीत, विरारसारख्या क्षेत्रात गुंतवणूक केल्याने पुन्हा एकदा तेंडुलकर कुटुंबीयांची चर्चा रंगली आहे. 

कोण आहे अंजली तेंडुलकर? (Who Is Anjali Tendulkar)

अंजली तेंडुलकर या एक डॉक्टर, समाजसेविका आणि भारतीय क्रिकेटमधील ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी आहेत. अंजली तेंडुलकरांनी स्वतःचे व्यावसायिक जीवन बाजूला ठेवून कुटुंब आणि सचिनच्या कारकिर्दीसाठी पूर्णपणे स्वतःला समर्पित केले आहे. अंजली तेंडुलकर एका श्रीमंत गुजराती कुटुंबातील आहेत. 1990 साली एका एअरपोर्टवर अंजली आणि सचिन यांची पहिली भेट झाली. काही काळ प्रेमसंबंधानंतर त्यांनी 24 मे 1995 रोजी विवाह केला. अंजली तेंडुलकर यांनी सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली; सचिन नेहमीच म्हणतो की त्यांच्या यशामागे अंजलीचा मोठा वाटा आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरकडून पहिल्यांदा सून सानिया चांडोकसह फोटो शेअर, लेक सारा अन् अंजली तेंडुलकर देखील सोबत

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalika Mahasangram Jalna : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर स्थानिकांचं मत काय? जालनाकर काय म्हणाले?
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये 4 युवतींनी मिळून केला महिलेचा खून; पोलिसांनी 24 तासांता लावला छडा
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
मोठी बातमी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 52 जागांचा प्रस्ताव, भाजपकडून आकडेवारी मांडत पहिली ऑफर
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
हायकोर्टाचा दणका, विशाल अगरवालचा जामीन फेटाळला; पुणे पोर्शे कार अपघात, मुलाचा बाप 17 महिन्यांपासून तुरुंगात
Embed widget