All Time XI : आपल्या अष्ठपैलू खेळाच्या जीवावर श्रीलंकेच्या अनेक विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या एंजेलो मॅथ्यूजने आपली ऑलटाईम इलेव्हन टीम निवडली आहे. त्याने सचिन तेंडुलकर या एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश आपल्या संघात केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या संघात पाच श्रीलंकन खेळाडूंचा समावेश आहे. 

Continues below advertisement

एंजेलो मॅथ्यूजने आपल्या संघात वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लाराचा समावेश केला आहे. सचिन तेंडुलकर सोबत सलामीला फलंदाजी करण्यासाठी त्याने कुमार संगकाराची निवड केली आहे. इंग्लंडच्या एकाही खेळाडूचा त्याने आपल्या संघात समावेश केला नाही. 

एंजेलो मॅथ्यूजने आपल्या ऑल टाईम इलेव्हन संघात श्रीलंकेच्या अरविंद डिसिल्व्हा, माहेला जयवर्धने, कुमार संगकारा, मुथय्या मुरलीधरन आणि चामिंडा वास या पाच खेळाडूंचा समावेश केला आहे. तसेच आफ्रिकेच्या जॅक कॅलिसचाही त्याने समावेशे केला आहे. एंजेलो मॅथ्यूजच्या संघात दोन स्पिनर्ससह पाच गोलंदाजांचा समावेश आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न, मॅक्ग्राथ आणि पाकिस्तानच्या वासिम आक्रमचा समावेश आहे.

Continues below advertisement

असा आहे एंजेलो मॅथ्यूजचा ऑल टाईम इलेव्हन संघसचिन तेंडूलकर, कुमार संगकारा (कर्णधार), ब्रायन लारा, अरविंद डिसिल्व्हा, माहेला जयवर्धने, जॅक कॅलिस, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, वासिम आक्रम, चामिंडा वास, ग्रेन मॅक्ग्राथ

महत्वाच्या बातम्या :