एक्स्प्लोर

Team India Head Coach : गौतम गंभीर टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी जवळपास निश्चित, IPL संघ मालकाकडून दुजोरा

India Head Coach : गौतम गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंना शिकवणी देणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. गौतम गंभीर याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे.

Gautam Gambhir Team India Head Coach : गौतम गंभीर टीम इंडियाच्या खेळाडूंना शिकवणी देणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. गौतम गंभीर याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्याशिवाय मेंटॉर म्हणूनही त्यानं यशस्वी काम केलेय. आयपीएल 2024 विजेत्या कोलकाता संघाचा गौतम गंभीर मेंटॉर होता. आता गंभीर टीम इंडियाचा हेड कोच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. क्रिकबजने याबाबतचे वृत्त दिलेय. राहुल द्रविडने कार्यकाळ वाढवण्यास नकार दिल्यानंतर बीसीसीआयकडून नव्या कोचचा शोध सुरु झाला होता. त्यासाठी अर्जही मागवण्यात आले होते. बीसीसीआयने गौतम गंभीर यालाही अर्ज करण्याचा आग्रह केला होता. गौतम गंभीर याचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं म्हटले जातेय. गौतम गंभीर आणि जय शाह यांच्यामध्ये 26 मे रोजी चेन्नईमध्ये दीर्घ चर्चा झाल्याचं समजतेय. 

क्रिकबजच्या रिपोर्ट्सनुसार, एका आयपीएल संघ मालकानं गौतम गंभीर टीम इंडियाचा कोच होणार असल्याची माहिती दिली. त्या संघमालकाच्या मते गौतम गंभीर टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक असेल.  बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली. याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. दरम्यान, टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.  

गौतम गंभीरकडे कोचिंगचा अनुभव नाही - 

गौतम गंभीर याच्याकडे आंतरराष्ट्रीय अथवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोचिंगचा कोणताही अनुभव नाही. 2022-2023 आयपीएल हंगामात गौतम गंभीर लखनौ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर होता. लखनौची कामगिरी शानदार झाली होती. आयपीएल 2024 हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात होता. गौतम गंभीर मेंटॉर असताना लखनौ संघ दोन वर्षे प्लेऑफमध्ये दाखल झाला होता. यंदा कोलकाताने चषकावर नाव कोरलेय.  यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणारा कोलकाता पहिला संघ ठरला होता. 

गौतमचं आंतरराष्ट्रीय करियर -

गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय करियर शानदार राहिलेय. त्यानं टीम इंडियासाठी 147 वनडे सामने खेळले आहेत, त्यामध्ये 5238 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये गौतम गंभीरने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली आहेत. गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळलाय, यामध्ये  4154 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने 9 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने द्विशतकही ठोकलेय. गौतम गंभीर याने 37 टी 20 सामनेही खेळले आहेत. यामद्ये 932 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान सात अर्धशतके ठोकली आहेत. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिलाय.

राहुल द्रविडकडून नकार - 

2023 वनडे विश्वचषकानंतर बीसीसीआयच्या विनंतीनंतर राहुल द्रविड यानं कार्यकाळ वाढवण्यास हमी दिली होती. 30 जूनपर्यंत राहुल द्रविड याचा कार्यकाळ आहे. पण आता राहुल द्रविड यानं कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला आहे. घरगुती कारण देत राहुल द्रविड याने कोचिंगपासून काढता पाय घेतला आहे. संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंनी त्यांना कायम राहण्याची विनंती केली होती. पण राहुल द्रविड याने आधीच निर्णय घेतला होता. लक्ष्मण यानेही नकार दिलाय. त्यामुळे आता बीसीसीआयकडू गौतम गंभीर याच्याकडे विनंती केली आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget