कर्णधारपद, ताकद, पॉवर मिळाल्याने कोहली बदलला, रोहित आजही पहिल्यासारखाच; अमित मिश्राने सांगितला फरक!
Rohit Sharma Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अमित मिश्राने रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत एक मोठं विधान केले आहे.
Rohit Sharma Virat Kohli: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील टीम इंडियाने (Team India) ऐतिहासिक कामगिरी करून टी-20 विश्वचषक जिंकला. या विजयासह रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. रोहित-विराटची जोडी आता केवळ वन-डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये दिसेल. याचदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अमित मिश्राने रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत बोलताना एक मोठं विधान केले आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या स्वभावात खूप फरक आहे. रोहित शर्मा आजही पहिल्यासारखाच आहे. तो त्याच्या सहकाऱ्यांना खूप स्वातंत्र्य देतो. मात्र विराट कोहलीमध्ये खूप बदल झाला आहे. तसेच विराट कोहली आणि माझ्यात आता संवादही होत नाही. कर्णधारपद, पॉवर आणि ताकद मिळाल्याने तो परिस्थितीनूसार बदलत गेला. परंतु रोहित शर्मा असा नाहीय आणि हाच दोघांमधील फरत असल्याचं अमित मिश्राने सांगितले.
रोहित शर्मा-विराट कोहली कधी निवृत्ती घेणार?
अमित मिश्रा म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहली येत्या दोन वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एखादा क्रिकेटर 35-36 वर्षांपर्यंत खेळतो, असंही तो म्हणाला. टीम इंडियाच्या कॅप्टनपदाबाबत विचारलं असता टी 20 क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या कॅप्टन असावा, असं अमित मिश्रानं म्हटलं. विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळतील का असा प्रश्न विचारला असता रोहित शर्मा आपल्याला खेळताना दिसणार नाही. मात्र, विराट कोहली पाहायला मिळू शकतो ,असं मत अमित मिश्राने व्यक्त केलं.
अमित मिश्रा शुभमन गिलबाबत काय म्हणाला?
शुभमन गिलला कर्णधारपद देण्याबाबत तुमचे मत काय?, असा सवाल अमित मिश्राला मुलाखतीत विचारण्यात आला. यावर मला वाटत नाही की त्याला कर्णधार बनवायला हवे. मी तिथे असतो तर मी त्याला कर्णधारपद दिले नसते. मी त्याला आयपीएलमध्ये पाहिले आहे, त्याला कर्णधार कसं केलं, मला माहित नाही. त्याला कर्णधारपदाची कल्पनाही नाही, असं अमित मिश्रा म्हणाला. शुभमन गिलला कदाचित मजबुरीतून आयपीएलमध्ये कर्णधार बनवण्यात आले होते. मिश्रा म्हणाला की, गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सकडे गेला तेव्हा गुजरात टायटन्सकडे पर्याय नव्हता, असंही अमित मिश्राने सांगितले.
संबंधित बातम्या:
हार्दिक पांड्या अन् मिस्ट्री गर्लचा फोटो समोर येताच नताशाची पोस्ट; 'प्रेम करा, पण...'