Africa Cricket Asociation Cup: आफ्रिका क्रिकेट असोसिएशन चषक 2022 च्या 9व्या सामन्यात केनियानं (Kenya)  9 विकेट्स राखून कॅमेरूनचा (Cameroon) पराभव केला. एवढेच नव्हेतर, कॅमरूनच्या संघानं दिलेलं लक्ष्य केनियानं फक्त 20 चेंडूत गाठलं. या विजयासह केनियाच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये नव्या विक्रमांची नोंद झालीय. क्रिकेटच्या इतिहासात चौथ्यांदाच असं घडलंय की, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या संघानं 100 किंवा त्यापेक्षा अधिक चेंडू राखून विजय मिळवलाय. 


या सामन्यात नाणेफेक जिंकून केनियाचा कर्णधार शेम न्गोचेनं (Shem Ngoche) कॅमेरूनला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या कॅमेरूनचा संघ केनियाच्या भेदक गोलंदाजीसमोर ढेपाळला. दरम्यान, कॅमरूनचा संघ अवघ्या 48 ऑलआऊट झाला.  प्रत्युत्तरात केनियाच्या संघानं एक विकेट्स गमावून आणि 100 चेंडू राखून कॅमेरूनच्या संघाला पराभवाची धुळ चारली. या सामन्यात केनियाकडून यश तलाशी आणि शेम न्गोचेनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तर, रुषभ पटेल 14 धावांची खेळी केली. तर, सुखदीप सिंहनं 26 आणि नेहेमियाह ओबियांबो सात धावा करून नाबाद परतले. 


अवघ्या 28 धावांत कॅमेरूननं 10 विकेट्स गमावल्या
नाणेफेक गमावल्यानंतर कॅमेरूनच्या संघानं 4.5 षटकात 20 धावापर्यंत एकही विकेटस् गमावली नाही. मात्र, त्यानंतर कॅमेरूच्या संघाच्या विकेट्स पडायला सुरुवात झाली. कॅमेरूनचा संघ 14.2 षटकात अवघ्या 48 धावांवर ऑलआऊट झाला. 


100 किंवा त्यापेक्षा अधिक चेंडू राखून विजय मिळवणारे संघ
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक चेंडू राखून विजय मिळवण्याची ही चौथी वेळ आहे. ऑस्ट्रियानं 2019 मध्ये तुर्कीविरुद्ध 2.4 षटकांत (16 चेंडू) लक्ष्य गाठलं होतं. या यादीत ओमानचा संघ दुसऱ्या क्रमाकांवर आहे. ओमानने या वर्षी फेब्रुवारीमध्ये फिलिपाइन्सविरुद्ध 2.5 षटकांत चेंडूंत 37 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं होतं.तिसऱ्या क्रमांकावर लक्सनबर्ग आहे. ज्यानं 2019 मध्ये तुर्कीविरुद्ध 3.1 षटकांत विजय मिळवला होता. या यादीत केनियाचाही समावेश झालाय. ज्यांनी 20 चेंडूत कॅमेरूनचा पराभव केलाय. या विजयासह केनियानं टी-20 क्रिकेटमध्ये खास विक्रमाला गवसणी घातलीय.


हे देखील वाचा-