India vs Australia 1st T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं ही मालिका दोन्ही संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. या मालिकेद्वारे कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि भारतीय क्रिकेट संघाला परफेक्ट प्लेईंग इलेव्हन कॉम्बिनेशन शोधण्यास मदत होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना मोहाली (Mohali) येथे रंगणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघाच्या संभाव्य प्लेईंग इलेव्हन, पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज कसा असेल? यावर एक नजर टाकुयात.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील पहिला सामना मोहालीच्या (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर (Punjab Cricket Association IS Bindra Stadium) खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 7.30 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरू होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचं सर्व अपडेट्स पाहता येतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापंर्यंत 23 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय.
खेळपट्टी आणि हवामानाची स्थिती
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर होणार आहे. येथे 2018 पासून आतापर्यंत झालेल्या 11 सामन्यांमध्ये सातवेळा लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानं विजय मिळवलाय. म्हणजेच, नाणेफेक जिंकल्यानंतर संघ प्रथम गोलंदाजी निवडण्याची शक्यता आहे. मोहालीमध्ये ढगाळ वातावरण असून 25% पावसाची शक्यता आहे.
भारताचा संभाव्य संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया संभाव्य संघ:
आरोन फिंच (कर्णधार), जोस इंगलिस, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), टिम डेविड, कॅमरून ग्रीन, एडम झम्पा, पॅट कमिंस, जोस हेजलवुड, सीन एबॉट.
हे देखील वाचा-