Ricky Ponting On Kohli: जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देणारा भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) आशिया षटकात दमदार फलंजाची करत पुन्हा फॉर्म गवसलाय. विराटनं बांगलादेशविरुद्ध 2019 मध्ये खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात अखेरचं शतक केलं होतं. त्यानंतर तब्बल 1 हजार 20 दिवसांनी त्याच्या बॅटीतून शतक झळकलंय. या दरम्यान, विराट कोहली भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendukar) शंभर शतकांचा विक्रम मोडणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनं (Ricky Ponting) स्पष्टीकरण देत विराट सचिनचा विक्रम मोडणार की नाही? यावर आपलं मत मांडलंय.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या नावावर सर्वाधिक शतकांची नोंद आहे. सचिननं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तब्बल शंभर शतकं झळकावली आहेत. त्यानंतर या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट आणि रिकी पॉन्टिंग सयुंक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विराट कोहली आणि रिकी पॉन्टिंगच्या नावावर 71 आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद आहे. विराटनं  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अतिशय वेगानं 70 शतकांचा टप्पा गाठला. परंतु, 71व्या शतकासाठी त्याला खूप प्रतिक्षा करावी लागली. नुकतीच पार पडलेल्या टी-20 आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध दमदार शतक झळकावत आपलं 71वं आतंरराष्ट्रीय शतक पूर्ण केलं. मात्र, यापूर्वीच्या काळात विराट कोहलीच्या प्रदर्शनाबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. ज्यात विराट सचिनच्या शंभर शतकांचा विक्रम मोडणार का? अशा महत्वाच्या प्रश्नाचाही समावेश होता. दरम्यान, अनेकांनी विराटच्या बाजूनं सकारात्मक प्रतिक्रिया दिली. तर, काहींनी स्पष्टपणे नाही म्हणून सांगितलं.


रिकी पॉन्टिंग काय म्हणाला?
विराट कोहली सचिनचा शतकांचा विक्रम मोडणार का? यावर रिकी पॉन्टिंग म्हणाला की, "मी विराटला असं कधीच म्हणू शकत नाही की, तो हे 'कधीच' करू शकणार नाही. कारण, विराट एकदा लयीत आला की, तो धावांसाठी किती भुकेला आहे? आणि यशासाठी तो किती कटिबद्ध आहे? हे तुम्हाला माहिती आहे. यामुळं विराट कोहली सचिनचा शतकांचा विक्रम मोडू शकणार नाही, हे मी स्पष्टपणे बोलू शकत नाही." 


भारत- ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात
आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिके खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज मोहालीच्या  पंजाब क्रिकेट असोसिएशन  आयएस बिंद्रा स्टेडियमवर रंगणार आहे. या मालिकेत विराट कोहली 72 व्या शतकाला गवसणी घालून रिकी पॉन्टिंगला मागं टाकण्याची शक्यता आहे.


हे देखील वाचा-