IND vs SA ODI Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात येत्या 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीनं भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळं एकदिवसीय मालिकेत पुन्हा एकदा शिखर धवनकडं (Shikhar Dhawan) भारतीय एकदिवसीय संघाचं नेतृत्व सोपवलं जाऊ शकतं. 


दरम्यान, भारताशी दोन हात करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरूवातील तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. टी-20 मालिका 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान खेळवली जाणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल. 


भारतीय संघ 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या खेळाडूंना 5 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा विचार करत आहे.ऑस्ट्रेलियामध्ये खेळाडूंना तयारीची पूर्ण संधी मिळावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे. बीसीसीआयने या संदर्भात संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशीही चर्चा केलीय. भारतीय खेळाडू 5 ऑक्टोबरलाच ऑस्ट्रेलियात पोहोचले तर त्यांना सरावासाठी अतिरिक्त आठवडा मिळेल. आगामी टी-20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. यापूर्वी भारताला दोन सराव सामने खेळायचे आहेत. 


शिखन धवनकडं एकदिवसीय संघाचं नेतृत्व सोपवण्याची शक्यता
एकदिवसीय मालिकेत शिखर धवनकंड भारतीय संघाचं नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत शिखर धवननं भारतीय एकदिवसीय संघाचं नेतृत्व केलं होतं. महत्वाचं म्हणजे, टी-20 विश्वचषकात संधी न मिळालेल्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. 


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारताचा संभाव्य संघ
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा करण्यात आली नाही. पंरतु, या मालिकेत शुभमन गिल सलामीवीराचा भूमिका बजावू शकतो. याशिवाय, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, आवेश खान, मोहम्मद सिराज यांसारख्या खेळाडूंना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे, विश्वचषकासाठी राखीव ठेवण्यात आलेले खेळाडू संघासह ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याचं बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केलंय.


हे देखील वाचा-