(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'क्रिकेटमध्ये 'देव'नंतर फक्त मी, शुभमन गिल विराट बनू शकत नाही...'; कोहलीच्या विधानाने खळबळ, नेमकं सत्य काय?
Virat Kohli Fake Video: सदर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मी ज्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे, तिथे पोहचणे अवघड असल्याचं विरोट कोहली बोलत आहे.
Virat Kohli Fake Video: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीचा (Virat Kohli) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली शुभमन गिलवर टीका करताना दिसत आहे.
सदर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मी ज्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे, तिथे पोहचणे अवघड असल्याचं विराट कोहली (Virat Kohli) बोलत आहे. विराट कोहलीच्या या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र विराट कोहलीचा हा व्हिडीओ डीपफेक असल्याचं समोर आलं आहे.
विराट कोहलीच्या डीपफेक व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सातत्य राखणे आणि लिजंड्स बनणे, यात खूप मोठा फरक आहे. मी जेव्हा ऑस्ट्रेलियातून माघारी आलो, तेव्हा मी स्वत:च्या खेळाचा विचार केला. यशस्वी होण्यासाठी काय करता येईल, याची मी तयारी केली आहे. मी शुभमन गिलचा खेळ जवळून पाहिला आहे, तो प्रतिभावान खेळाडू आहे, यात काही शंका नाही. पण चांगले खेळणे आणि लिजंड्स बनणे यात खूप फरक आहे. शुभमन गिलला लोक पुढील विराट कोहली अशी उपमा देत आहे, पण विराट फक्त एकच आहे, हे मला स्पष्ट करायचे आहे, असं विराट कोहली व्हिडीओमध्ये बोलताना दिसतो.
'भारतीय क्रिकेटमधील देव'नंतर मीच-
मी जगातील सर्वात आव्हानात्मक गोलंदाजांचा सामना केला. संघ अडचणीत असताना कसं खेळायचं हे मी अनेकदा अनुभवलं आहे आणि संघाला त्यातून विजय मिळवून दिला आहे. मी दशकाहून अधिक काळ सातत्यपूर्ण खेळ केला. भारतीय क्रिकेटमध्ये 'गॉड'नंतर मीच आहे. शुभमन गिलला या स्तरावर येण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागेल, असंही विराट कोहली या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
AI is Dangerous pic.twitter.com/njUvwiwc4t
— Cricketopia (@CricketopiaCom) August 27, 2024
सचिन तेंडुलकरही ठरला होता डीपफेकचा बळी-
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही डीपफेकचा बळी ठरला होता. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो 'स्कायवर्ड एव्हिएटर क्वेस्ट' गेमिंग ॲपची जाहिरात करताना दिसत होता. सचिनने स्वतः तो पोस्ट करत हा व्हिडिओ खोटा असून तुम्हाला फसवण्यासाठी बनवण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. तंत्रज्ञानाचा गैरवापर हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. या संदेशासह सचिन तेंडुलकरने भारत सरकार, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांना टॅग केले होते.