(Source: ECI/ABP News/ABP Majha)
2023 World Cup : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, मॅक्सवेल गोल्फ खेळायला गेला अन् दुखापत घेऊन आला
2023 World Cup Glenn Maxwell : पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाला विश्वचषकात (2023 World Cup) मोठा धक्का बसलाय.
2023 World Cup Glenn Maxwell : पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाला विश्वचषकात (2023 World Cup) मोठा धक्का बसलाय. शानदार लयीत असलेला अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल (glenn maxwell) दुखापतग्रस्त झालाय. इंग्लंडविरोधात शनिवारी होणाऱ्या सामन्यासाठी ग्लेन मॅक्सवेल उपलब्ध नसेल. गोल्फ खेळताना मॅक्सवेल दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे तो पुढील सामन्याला मुकला आहे. लयीत असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला हा मोठा धक्का मानला जातोय. मॅक्सवेल याने फलंदाजी आणि गोलंदाजीत मोठं योगदान दिले होते.
ग्लेन मॅक्सवेल याने नेदरलँड्सविरोधात अवघ्या 40 चेंडूत शतक ठोकले होते. हे विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक होय. अहमदाबाद येथे होणाऱ्या सामन्यात मॅक्सवेल उपलब्ध नाही, हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का होय. सोमवारी गोल्फ खेळताना मॅक्सवेलला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून सावरण्यासाठी मॅक्सवेलल आठवडाभराचा कालावधी लागणार आहे. दुखापत तितकी गंभीर नसल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर आलेय.
मॅक्सवेलचे वनेडीत कामगिरी -
34 वर्षी ग्लेन मॅक्सवेल याने ऑस्ट्रेलियासाठी दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियासाठी मॅक्सवेल याने आतापर्यंत 135 वनडे सामने खेळले आहेत. त्यमधील 124 डावात 33.86 च्या सरासरीने आणि 125.76 च्या स्ट्राईक रेटने 3691 धावा केल्या आहेत. 2012 मध्ये अफगाणिस्तानविरोधात मॅक्सवेलने वनडेमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने तीन शतके आणि 23 अर्धशतके ठोकली आहेत. गोलंदाजीतही त्याने शानदार कामगिरी केली आहे. 107 डावात 5.49 च्या इकॉनॉमीने 68 विकेट घेतल्या आहेत.
Glenn Maxwell ruled out against England due to a freak concussion incident falling off the back of a golf cart. (Code Sports). pic.twitter.com/CyY8oFvlSM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 1, 2023
विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाची कामगिरी -
ऑस्ट्रेलियाची विश्वचषकात खराब सुरुवात झाली होती. चेन्नईच्या मैदानात पहिल्याच सामन्यात भारताकडून पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला 134 धावांनी पराभूत केले होते. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाने वादळी सुरुवात करत कमबॅक केले. ऑस्ट्रेलियाने सलग चार सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तान, श्रीलंका, नेदरलँड्स आणि न्यूझीलंड यांचा पराभव करत गुणतालिकेत टॉप 4 मध्ये स्थान मिळवले. ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील सहा सामन्यात चार विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाचा आगामी सामना इंग्लंडविरोधात 4 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल उपलब्ध नाही. इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. त्यामुळे इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाची पार्टी खरा करु शकतो. अशा स्थितीत महत्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे ऑस्ट्रेलियापुढील अडचणी वाढल्या आहेत.