IND Vs WI 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात (India Vs West Indies) आज तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना रात्री 8 वाजता खेळला जाणार होता. परंतु, या सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दिलेल्या वेळेनुसार, हा सामना रात्री 9.30 वाजता खेळला जाणार आहे.
भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा टी-20 सामना उशीरानं
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात काल दुसरा टी-20 सामना खेळला गेला. परंतु, या सामन्याला सुरुवात होण्यात खूप उशीर लागला होता. भारतीय वेळेनुसार, हा सामना रात्री 8 वाजता सुरु होणार होता. परंतु, रात्री 11 वाजता या सामन्याला सुरुवात झाली. याचपार्श्वभूमीवर तिसरा टी-20 सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
बीसीसीआयचं ट्वीट-
बीसीसीआयची माहिती
“सेंट किट्स येथे 2 ऑगस्ट रोजी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 ऐवजी रात्री 9 वाजता होईल, तर सामना रात्री 9.30 वाजता सुरू होईल", अशी माहिती बीसीसीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिलीय.
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा पाच विकेट्सनं पराभव
वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारतीय संघानं अत्यंत निराशाजनक कामगिरी करून दाखवली. वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज ओबेड मॅकॉयच्या भेदक माऱ्यापुढं भारताचा संघ डगमताना दिसला. भारताचा डाव 19.2 षटकात 138 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजच्या संघानं पाच विकेट्सनं सामना जिंकला.
वेस्ट इंडीजचं मालिकेत कमबॅक
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतानं पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात भारताला पराभूत करून वेस्ट इंडीजच्या संघानं कमबॅक केलं. या मालिकेतील तिसरा सामना आज खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, या सामन्यात रात्री आठ वाजता सुरुवात केली जाणार होती. परंतु, या सामन्याच्या वेळत बदल करण्यात आलाय. हा सामना रात्री 9.30 वाजता सुरु होईल.
हे देखील वाचा-
- भारताविरुद्ध ओबेड मॅकॉयची विक्रमी कामगिरी; जगातील कोणत्याचं गोलंदाजाला जमलं नाही, पण त्यानं करून दाखवलं!
- भारताविरुद्ध ओबेड मॅकॉयची विक्रमी कामगिरी; जगातील कोणत्याचं गोलंदाजाला जमलं नाही, पण त्यानं करून दाखवलं!
- CWG Live Updates Day 5: क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स