नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघातील आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी पाच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. आतापर्यंत भारतीय हॉकी संघातील एकूण सहा खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. आता हॉकी स्टार मनदीप सिंह याला कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. भारतीय हॉकी संघाचा सध्या बँगलोरमध्ये कॅम्प सुरु आहे.


मनदीप व्यतिरिक्त भारतीय पुरुष हॉकी संघाचे कर्णधार मनप्रीत सिंह, सुरेंद्र कुमार, जसकरण सिंह, कृष्णा बी आणि वरुण कुमार बंगळूरुमध्ये राष्ट्रीय शिबिराआधी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे खेळाडू भारतीय खेळ प्राधिकरणातील नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलेंस (एनसीओई) मध्ये टीमसोबत रिपोर्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.


मनप्रीतसह सर्व अॅथलीट, ज्यांनी शिबीरासाठी दाखल झाले होते. आरोग्य मंत्रालयाच्या नियमांनुसार, क्वॉरंटाईनमध्ये राहत होते. परंतु त्यांना सुरक्षेसाठी क्वॉरंटाईन केलं होतं.


मनप्रीत बंगळूरूमध्ये बोलताना म्हणाला की, 'मी साई कँम्पसमध्ये क्वॉरंटाईन आहे आणि साई अधिकाऱ्यांनी ज्याप्रकारे सर्व परिस्थिती हाताळत आहे. ते खरच कौतुकास्पद आहे. मी अत्यंत आनंदी आहे की, त्यांनी अॅथलिट्सची कोरोना चाचणी करणं अनिर्वाय केलं आहे. मी ठिक आहे आणि लवकरच बरा होण्याची आशा आहे.'


दुबईत आयपीएलसाठी गेलेले खेळाडू राहणार क्वॉरंटाईन; BCCI च्या निर्णयावर सर्व संघांची संमती


इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 13व्या सीझनचं आयोजनाच्या पार्श्वभूमीवर सर्व संघांच्या खेळाडूंनी क्वॉरंटाईन होण्याबाबत एका महत्त्वाच्या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. बीसीसीआय आणि संघाचे मालक यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हे स्पष्ट झालं आहे की, सर्व खेळाडू दुबईत दाखल झाल्यानंतर 6 दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहणार आहेत. खेळाडूंच्या प्रॅक्टिससाठी आयपीएलमधील सर्व संघ आपल्या खेळाडूंसह 20 ऑगस्ट रोजी दुबईत दाखल होणर आहेत. बैठकीनंतर सर्व संघांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, आम्हाला खेळाडूंच्या आरोग्यासोबत कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही. सर्व खेळाडू आणि स्टाफ दुबईत दाखल झाल्यनंतर 6 दिवसांसाठी क्वॉरंटाईन होणार आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :