Ketaki Chitale Case : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दलच्या वादग्रस्त पोस्टनंतर अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) अडचणीत सापडली आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावरील इतर गुन्ह्यांचा तपासही सुरु आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या अपडेटनुसार केतकीला अॅट्रोसिटी काद्यान्वे जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 हजार रुपयांच्या दंडानंतर तिला जामीन मंजूर ढाला असला तरी तुरुंगातून मात्र तिची सुटका अद्याप झालेली नाही. कारण एका दुसऱ्या केसची सुनावणी केतकीविरुद्ध सुरु असून ही सुनावणी 21 जून रोजी होणार असल्याने ती अद्यापही जेलमध्येच राहणार आहे. दुसरीकडे केंद्रीय महिला आयोगानेही या प्रकरणात उडी घेत पोलीस महासंचालक रजनीस सेठ यांना नोटीस पाठवली आहे.



अभिनेत्री केतकीने राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. ज्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल करुन तिला तुरुंगात देखील टाकण्यात आलं आहे. या प्रकरणात सतत नवनवीन अपडेट समोर येत असून नुकतच केतकीने मुंबई उच्च न्यायालयात तिला झालेली अटक बेकायदेशीर असल्याची याचिका दाखल केली. ज्यानंतर आता केंद्रीय महिला आयोगाने देखील तिच्या बाजूने येत पोलीस महासंचालक रजनीस सेठ यांना नोटीस पाठवली आहे.


नेमकं प्रकरण काय?


अभिनेत्री केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. केतकी चितळेनं ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं असून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनंच केली आहे, असे म्हणत कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल केला गेला होता. याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, ती सध्या कारागृहात आहे. कळवा पोलीस ठाण्यातील हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत केतकीनं आता उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल केल्याचा दावाही केतकीनं आपल्या याचिकेतून केला असून याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.


संबंधित बातम्या


Ketaki Chitale : ‘ठाणे पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर!’, अभिनेत्री केतकी चितळेने ठोठावले मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे


कोणाचेही मूलभूत अधिकार अमर्याद नाही, शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला दिलासा देण्यास कोर्टाचा नकार


Ketaki Chitale : केतकी चितळेचा तुरूंगातील मुक्काम वाढला, ठाणे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला