ख्रिस गेलची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
वेस्ट इंडियने 1999 मध्ये भारताविरोधात एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं होतं. ख्रिस गेलने 2015 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 215 धावांची खेली केली होती. एकदिवसीय सामन्याततील विडिंज खेळाडूची ही सर्वोच्च खेळी आहे.
मुंबई : वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ख्रिस गेल एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. इंग्लंडविरुद्ध सुरु होणाऱ्या मालिकेआधी ख्रिस गेलने निवृत्तीची घोषणा केली आहे.
मोठ्या गॅपनंतर ख्रिस गेलचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झालं आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून किंगस्टन ओव्हल येथे सुरुवात होत आहे. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत ख्रिस गेलला वेस्ट इंडिज संघात स्थान मिळालं आहे. ख्रिस गेल वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये यादीत आघाडीवर आहे.
वेस्ट इंडिजचा खेळाडू म्हणून माजी कर्णधार ब्रायन लारानंतर सर्वाधिक धावा ख्रिस गेलच्या नावे आहे. गेलने आतापर्यंत 284 एकदिवसीय सामन्यात 9727 धावा केल्या आहेत. यामध्ये 23 शतके आणि 49 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर 165 विकेट्सही आहेत. तर ब्रायन लाराने एकदिवसीय कारकिर्दीत 10405 धावा ठोकल्या आहेत.