एक्स्प्लोर
Advertisement
'क्रिजपासून सहा इंच बाहेर राहून फलंदाजी करा'
'मी त्यांना सल्ला देईन की, क्रिझमध्ये उभं राहण्याऐवजी त्यांनी कमीत कमी सहा इंच क्रिझच्या बाहेर उभं राहावं आणि चेंडूला जास्त स्विंग होण्याची संधी देऊ नये.'
पुणे : द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाज वेगवान आक्रमणाचा सामनाच करु शकली नाही. यामुळे टी 72 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय फलंदाजांचा फॉर्म पाहून माजी दिग्गज क्रिकेटर चंदू बोर्डे यांनी पीटीआयशी बोलताना टीम इंडियाला एक मोलाचा सल्ला दिला आहे.
चंदू बोर्डे यांनी भारतीय संघ सेंच्युरियनमध्ये पुनरागमन करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. याचविषयी बोलताना त्यांनी टीम इंडियाच्या फलंदाजांना काही टिप्सही दिल्या आहेत.
'सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला विकेटवर उभं राहावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे ऑफ स्टम्पवरील चेंडू सोडायला हवेत. आमचे अनेक फलंदाज हे विकेटच्या मागे झेल देऊन बाद झाले.' असं ते यावेळी म्हणाले.
'मी त्यांना सल्ला देईन की, क्रिझमध्ये उभं राहण्याऐवजी त्यांनी कमीत कमी सहा इंच क्रिझच्या बाहेर उभं राहावं आणि चेंडूला जास्त स्विंग होण्याची संधी देऊ नये.' अशा खास टीप्स त्यांनी यावेळी दिल्या.
'द. आफ्रिकेचा दौरा करणारी ही भारताची सर्वात मजबूत टीम आहे. या टीममध्ये बरीच क्षमता आहे. कोणताही परिस्थितीत चांगली कामगिरी करणारे खेळाडू यांच्याकडे आहेत. त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत जबरदस्त कामगिरी करेल अशी आशा आहे.' असंही ते यावेळी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement